आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कुल,आरोस चा वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न
शाळेच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करुया-राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब
सावंतवाडी (सुखदेव राऊळ )आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कुल ,आरोस चा वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्धाटन राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी केले .
कार्यक्रमाचे प्रमुख अथिती म्हणून घारे उपस्थित होत्या .यावेळी शाळेच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करु , अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या .
यावेळी विद्यार्थी विद्यार्थीनीचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा अर्चना घारे परब यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन,स्वागत गीत ,दीपप्रज्वलन ने करण्यात आली.त्यांनतर पाहुण्यांचे स्वागत, उपस्थित मान्यवरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन,करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक विद्याधर देसाई यांनी अहवाल वाचन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच आदर्श विद्यार्थी यश दिनेश खोत, विद्यार्थिनी उज्ज्वला उमेश रेडकर.आदर्श पालक मदन मुरकर,आदर्श शिक्षक लाडू सावंत यांना विशेष गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यामध्ये सहभागी होत अर्चना घारेंनी त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला प्रमुख अथिती म्हणून माजी मुख्याध्यापक अन्वर अब्दुल, रझाक खान ,महेंद्र पेडणेकर,सुरेश गावडे,संस्था उपाध्यक्ष निलेश परब, संस्था सदस्य मिलिंद जोग, अर्जुन मुळीक, संदीप नेमळेकर, मुख्याध्यापक विद्याधर देसाई, शिक्षक लाडू सावंत,समिधा मांजरेकर, देवयानी चव्हाण, श्रद्धा परब, प्राची परब, शिक्षकेतर कर्मचारी तानाजी खोत, लक्ष्मण शेळके, तसेच राजन नाईक , नारायण मुळीक ,संस्थेचे सदस्य पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रस्थाविक विद्याधर देसाई, सूत्रसंचालन तानाजी वरक, तर आभार अनिल नाईक यांनी मानले.

