कोकण

कै. फ्रान्सीस डिसोझा यांची रविवारी कोलगांव मध्ये शोकसभा

कै. फ्रान्सीस डिसोझा यांची रविवारी शोकसभा

 

सावंतवाडी, दि.०१:-कोलगांव गावचे खरे विकासपुरुष, सतत जे जनतेला प्रसंगात आधार बनून राहिले तसेच गेली ३५ वर्षे कोलगांव ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंच पदे भूषवली, तसेच इतर सामाजिक क्षेत्रात ज्यांनी खरच अभिमानास्पद कार्य केले असे कै. फ्रान्सीस डिसोझा यांचे रविवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी गोवा येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार दिनांक ०३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कोलगांव सोसायटी येथे सभागृहात सर्व कोलगांव ग्रामस्थ यांच्यावतीने शोकसभा आयोजित केली आहे. तरी सर्व ग्रामस्थ,राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, त्यांचे मित्रमंडळी तसेच हितचिंतक यांनी सर्वांनी कै. फ्रान्सीस डिसोझा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!