मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील १२ प्रमुख संशयित आरोपींसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
.अनधिकृत पणे बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्या प्रकरणी तसेच एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील १२ प्रमुख संशयित आरोपींसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, शिवसेनेचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांच्यासह १० जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली.
प्युअर अनिमल लव्हर (पाल) या प्राणी प्रेमी संस्थेच्या माध्यमातून सुप्रिया मधुकर दळवी (रा. कोळब, मालवण) यांनी गुरुवारी मालवण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार या सर्वांवर भादवि कलम 429, 34 यासह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आ.

