कोकणकोल्हापूरक्राइममहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या इन्सुलीतील एकाला गवसे येथे कोल्हापूरच्या भरारी पथकाने घेतले ताब्यात.

🛑बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या इन्सुलीतील एकाला गवसे येथे कोल्हापूरच्या भरारी पथकाने घेतले ताब्यात.

🛑या कारवाई मध्ये ८ लाख ७८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बांदा, दि.२६: बेकायदा दारू वाहतूक करताना कोल्हापूरच्या भरारी पथकाने इन्सुलीतील एकाला गवसे येथे ताब्यात घेतले. ही कारवाई काल आंबोली- आजरा मार्गावर करण्यात आली. यात संशयिताकडून ८ लाख ७८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॅनीश कामील फर्नांडिस (२६, रा. इन्सुली पागावाडी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून विविध ब्रँडचे एकूण १८० मिलीच्या ३८४ बाटल्या व ७५० मिलीच्या ४२० बाटल्या, अशी एकूण ३ लाख ५८ हजार ३२० रुपयांची दारु व वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे ५ लाख २० हजार रुपयांची स्विफ्ट कार (एमएच ४८ ए ६५०६), असा एकूण ८ लाख ७८ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या आदेशान्वये निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, जे. एस. पवार, काँस्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, संतोष बिराजदार, दीपक कापसे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.

———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!