कारिवडे येथील सुनिल परब यांचे निधन
सावंतवाडी कारीवडे पेडवे वाडी येथील सुनील परब वय 42 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात कार्यरत होते . गावातील सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असायचे. भाजपा जिल्हा चिटणीस महेश सारंग यांचे ते विश्वासू सहकारी होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,मुलगा, मुलगी, भाऊ, असा परिवार आहे त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.