कोकणसामाजिक

७-८ वर्षांपूर्वी अपंगत्व आलेल्या रुग्णाला हृदय शस्त्रक्रियेसाठी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे रक्तदात्यांनी केले रक्तदान

सिंधुदुर्ग प्रतिनिधी

सात आठ वर्षांपूर्वी अपंगत्व आलेल्या मुटाट देवगड येथील विजय सीताराम घाडी (वय ४६) यांना गोवा मेडिकल कॉलेज येथे (गोमेकॉ) हृदय शस्त्रक्रियेसाठी रक्तदात्याची गरज होती. यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे रक्तदाते साईस्वरूप देसाई व सुनील गावडे यांनी गोवा येथे जावून रक्तदान केले. तसेच मित्तल देसाई ( तांबोळी, सावंतवाडी) व एक स्थानिक रक्तदानाला गेले होते; मात्र काही तांत्रिक कारणास्तव ते रक्तदान करू शकले नव्हते . चार रक्तदात्यांची गरज होती; पण दोघे अपात्र ठरल्याने रुग्णाची पत्नी अस्वस्थ झाली. त्यांनी याबाबत साईस्वरूप देसाई यांना व्यथा सांगितली. त्यावेळी देसाई यांनी त्यांना धीर दिला आणि केवळ रक्तदान रक्तदाताही करून स्वस्थ न बसता रात्रभर प्रयत्न करून एका मित्राला आणि भाच्याला पहिल्यांदाच रक्तदानासाठी प्रेरित केले आणि रक्तदान करवून घेतले.

मेल्किऑर परेरा ( सावंतवाडी) यांनी केवळ एकविसाव्या वर्षी पहिल्यांदाच, तर अनिकेत खानोलकर (रा. केर, ता. दोडामार्ग) यांनी अठ्ठाविसाव्या वर्षी पहिल्यांदाच रक्तदान केले. दात्यांच्या अमूल्य रक्त घाडी कुटुंबीयांनी आभार मानले.

यासाठी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे तालुका सचिव बाबली गवंडे व नीलेश मोरजकर यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!