काँग्रेस चे बाबल्या दुभाषी, शिवसेनेचे राकेश नेवगी व गणेश निंबाळकर यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
सावंतवाडी, .दि२५ येथील काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष बाबल्या दुभाषी, शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख राकेश नेवगी व गणेश निंबाळकर यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना पक्ष प्रवेश देण्यात आला. दरम्यान आगामी काळात होणाऱ्या पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर आघाडी करणार नाही म्हणून बाबल्या दुभाषी तर शिवसेनेतून आपल्याला तिकीट मिळणार नाही म्हणून राकेश नेवगी यांनी आज राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सावंतवाडी विधानसभा मतदार संघ अध्यक्षा अर्चना घारे, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कमळकर, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, हिदायतुल्ला खान, शहर अध्यक्ष देवा टेमकर, अफरोज राजगुरु, इफ्तिकार राजगुरू, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, रिद्धी परब, प्रफुल्ल सुद्रिक, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, प्रसाद दळवी आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

