चराठे गावासाठी २५/१५ च्या फंडातून मंजूर झालेल्या कामांचे झाले आज भूमिपूजन
सावंतवाडी, दि.१८:- २५/१५ च्या फंडातून चराठे ग्रामपंचायतहद्दीत शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचा माध्यमातून बरीच विकासकामे मंजूर झाली आहे. मंत्री दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्या मूळे चराठे गावडेशेत आणि गावठणवाडी या विभागात गटार कॉक्रीटीकरण,रस्ता डांबरीकरण,रस्ता काँक्रीटकरणं ह्या साठी एकूण १० लाख निधी ची विविध कामे मंजूर झाली आहेत यांची भूमिपूजने आज करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे
जिल्हाप्रमुख अशोक दळवी,गजा नाटेकर,सरपंच प्रचिती कुबल आणि ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ बाळू परब,माजी सरपंच बाळू वाळके,मंगेश धुरी,बाळू कुबल,राजू कुबल,प्रशांत बिर्जे,समीर नाईक
आदी उपस्थित होते.

