कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

रंगभूषाकार व वेशभूषाकार संजय जोशी यांना यावर्षीच्या स्पर्धेत रंगभूषाकार साठी द्वितीय क्रमांक प्राप्त

🛑रंगभूषाकार व वेशभूषाकार संजय जोशी यांना यावर्षीच्या स्पर्धेत रंगभूषाकार साठी द्वितीय क्रमांक प्राप्त

🛑राज्य नाटय स्पर्धा मालवण येथे ” तुका अभंग अभंग ” या नाटकासाठी केली होती उत्कृष्ट रंगभूषा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी-सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,२१ : “स्वत:ची रंगभूषा व वेशभूषा करतानाच आपल्या सोबत दशावतार भूमिका साकारणाऱ्या इतर कलाकारांची रंगभूषा व वेशभूषा करण्यात मला अधिक आनंद मिळतो. बरेच काही शिकता येते.”अशी प्रतिक्रिया देताना मळगांव चे सुपूत्र तथा विनोदी कलाकार व दशावतारातील ‘शंखासुर’ ही भूमिका मळगांवचे सुपूत्र कै. भरत राऊळ (माळीचेघर ) यांच्या नंतर मळगांव दशावतार मधून रंगभूषा व वेशभूषाकार तसेच विविध भूमिका साकारणारे संजय जोशी यांना यंदाचा रंगभूषाकार हा पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्य नाटय स्पर्धा मालवण येथे संजय जोशी यांना हा पुरस्कार ” तुका अभंग अभंग ” या नाटकाच्या रंगभूषाकार या दशावतारातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मिळाला आहे. मळगांवचे सुपूत्र तथा श्री देवी माऊली महापुरुष बाल दशावतार नाट्य मंडळ मळगांव, ब्राह्मणाळीचे सर्वेसर्वा असलेले संजय जोशी हे गेली अनेक वर्षे दशावताराची सेवा करत आहेत. जोशी यांना मिळालेल्या या यशाचे मळगांव पंचक्रोशी सहीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार मित्र, कुटुंबिय व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. मळगांव मधील जोशी वाडी येथील रहिवासी तथा मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचे विद्यार्थी असलेल्या संजय बापू जोशी यांना मिळालेला महाराष्ट्र राज्य अखिल मराठी नाट्य स्पर्धा या स्पर्धेअंतर्गत केंद्र मालवण येथे पार पडलेल्या स्पर्धेत हा रंगभूषाकार साठीचा द्वितीय क्रमांक मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वयाच्या पंधराव्या वर्षापासून या कलेची आवड निर्माण झाल्यापासून व मळगांव मधील रंगकर्मी कै. आबा कोंडये व कै. केशव गोसावी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्या मुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती व आजही आहे. तसेच पुढेही राहणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
इतकेच नव्हे तर संजय जोशी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दशावतार कलाकारही घडवले आहेत व त्यांना रंगभूषा व वेशभूषा केली आहे. मळगांव चे सुपूत्र तथा जेष्ठ व अनुभवी दशावतार कलाकार बाबुराव आसयेकर तसेच दत्तात्रय नाईक (मळेवाड) हे आपले गुरु आहेत असे अभिमानाने सांगणाऱ्या संजय जोशी यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण आसयेकर, नितीन आसयेकर, रत्नाकर मांजरेकर, रमेश शिरोडकर, प्रथमेश मळगांवकर तसेच निरवडे मधील दशावतार कलाकार बंड्या गोवेकर यांना रंगभूषा व वेशभूषा करतानाच दशावतारातील भूमिकांचे मार्गदर्शन केले आहे.हे सर्वजण दशावतार क्षेत्रात सद्या नावलौकिक मिळवून आहेत. यासहित संजय जोशी यांनी श्री देवी माऊली महापुरुष बाल दशावतार नाट्य मंडळ मळगांव या आपल्या दशावतार कंपनीतून आणखी नवे चेहरे या क्षेत्रात आणले आहेत, यामध्ये कु. साहील गावकर(सोनुर्ली) ,साहील तळकटकर,वल्लभ पोपकर (माजगांव) ,ओमकार नवार (मळगांव), यश माधव(माजगांव) तसेच शिवम जोशी व बापू जोशी (पुतणे) यांचा समावेश असून हे सर्वजण संजय जोशी यांच्या कडून दशावताराचे धडे गिरवत आहेत.विशेषत: शिवम व बापू जोशी यांच्या बद्दल बोलताना संजय जोशी यांनी हे दोघेही जण आपला वारसा चालवतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
संजय जोशी यांनी त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल व यशा बदल बोलताना हा सन्मान ग्रामदेवता व श्री गणराया यांच्या कृपेमुळे मिळाला असल्याची भावना व्यक्त केली असून आपल्या चाहत्यांकडून व दशावतार प्रेमींकडून मिळालेल्या प्रोत्साहन व पाठिंबा यामुळे हा सन्मान आपणांस मिळाला असल्याचे आभार व्यक्त केले आहेत.
रंगभूषा व वेशभूषाकार या दशावतारातील योगदानासहीत संजय जोशी हे मळगांवच्या दशावतार कंपनीत विनोदी भूमिकां प्रमाणेच शंखासुर ही दशावतारातील महत्वपूर्ण भूमिका गेली अनेक वर्षे साकारत आहेत. या पुर्वी मळगांव मधील जुन्या दशावतार कंपनीत ही भूमिका माळीचेघर, मळगांव मधील कै. भरत राऊळ हे साकारत होते. संजय जोशी यांनी कै. भरत राऊळ यांची परंपरा जपताना ” खा देवा खा लाडू खा, खाजा खा, भजी खा ” असे गाऱ्हाणे सांगत काळ्या कड्यातील शंखासुर साकारणारे संजय जोशी यांनी आपण कै. भरत राऊळ यांचा शंखासुर पाहूनच आपण बरच काही शिकलो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.शंखासुर याच्या प्रमाणेच दशावतारातील भटजी ही भूमिका साकारणारे संजय जोशी हे कै. भरत राऊळ व इतर दशावतारातील शंखासुर व भटजी या भूमिका साकारणारे कलाकार यांच्या तुलनेत व त्यांच्या तोला मोलाची भूमिका साकारताना, ” दशावतारातील सर्वात प्रथम रंगमंचावर येणाऱ्या गणपतीची पूजा करण्यासाठी भटजी त्याला जी आंघोळ घालतो ती आंघोळ घालताना व गणपतीच्या डोक्यावर पाणी ओतताना, “बड… बड… बड…. , चुळ…. चुळ… चुळ” असा म्हणजेच वरुन पाणी ओतताना व ते पाणी खालून धरल्याने होणारा आवाज काढणे हा त्यांचा अभिनय खुप हसवणारा असतो.तर त्यानंतर रंगमंचावर येणारा काळे कपडे परिधान केलेला शंखासुर साकारताना, “आंब्यावर जांभा, माडावर गाय, कोंडीवर धोंडा, समुद्रावर ओणवा” हा संवाद बोलत पेटी वादक अर्थात नाईक यांच्या कडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची जी विनोदी उत्तरे देतो ती उत्तरे संजय जोशी यांनी साकारलेला शंखासुर पहाण्यासारखा असतो. तर त्यानंतर येणाऱ्या विष्णू सोबतचे विनोदी संभाषण व युद्ध ही संजय जोशी मजेशीर पणे साकारतात. इतकेच नव्हे तर संजय जोशी हे शंखासुर, भटजी तसेच त्यानंतर रंगमंचावर साकार होणाऱ्या दशावतार आख्यायिका नाटकात दारुड्याची विनोदी भूमिका साकारताना उत्तम बेवडा सादर करतात. तसेच संजय जोशी हे साईबाबा,भिकारी आदी भूमिका सुद्धा उत्तम रित्या साकारतात. इतकेच नव्हे तर संजय जोशी यांनी आतापर्यंत खलनायक ही भूमिकाही अनेक वेळा साकारली आहे.
दशावतारातील या योगदानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय जोशी यांनी कोकण लाईव्हला, “आपण या पुढेही दशावतारातील वेशभूषाकार, रंगकर्मी, शंखासुर, भटजी, साईबाबा, खलनायक व अन्य भूमिका यापुढे ही साकारणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी दशावतारातील भावी कलाकार आपण घडवत राहावे यासाठी आपणास गणपती व गावातील ग्रामदेवता व प्रेक्षकांनी आशीर्वाद द्यावा असे गाऱ्हाणे सांगताना आपले दोन पुतणे शिवम व बापू संजय जोशी यांनी आपली ही कला पुढे जोपासावी असा मनोदय व्यक्त केला आहे.

________________________
*📦📩 🚚कुरिअर सेवा उपलब्ध🚚 📩📦*

_*तेज कुरिअर्स*_
घाटगे ग्रुप कंपनी
सुरक्षित आणि निश्चित… 1992 पासून

*_📦✉️डॉक्युमेंट,पार्सल सर्व्हिसेस📦📩_*

*🔹स्थानिक* *🔹राष्ट्रीय* *🔹आंतरराष्ट्रीय*

संपूर्ण महाराष्ट्र,कोकण,कर्नाटक, गोवा सह इतर राज्यातही योग्य दरात कुरिअर सेवा उपलब्ध

*• प्रीमियम सेवा*
*तेज एलिट* (दुपारी १२ च्या आत डिलिव्हरी)
*तेज शुअर* २४ तासांच्या आत डिलिव्हरी
*तेज सुरक्षा* लॅपटॉप, मोबाईल, गिफ्ट इ. बुकिंग
*तेज पासपोर्ट* एक्सेल सुरक्षित पासपोर्ट वितरण
*तेज रिमोट* रिमोट एरिया डिलिव्हरी

*🔅वैशिष्ट्ये :*
• पार्सल,डॉक्युमेंट पिकअप ची सुविधा
• स्वत: To Pay ची सोय
• अर्जन्ट डिलेव्हरीची सोय
• मेडिकल क्षेत्रात अग्रगण्य सर्व्हिसेस (Specialist)
• अर्जन्ट टपाल, पार्सल पाठविण्याची सोय
• International कुरिअर ची सोय
• COD ची सोय
•मोबाईल मधून ऑनलाईन ट्रॅकिंग व ऑनलाईन पोच पावती मिळण्याची ची सुविधा

*🎴संपर्क:-*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067

*👇🏻तेज कुरिअर Facbook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/

*अटी आणि शर्ती लागू*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!