कोकणसामाजिक

एजेएफसी या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचा अभिमन्यू लोंढे यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती राज्य पुरस्कार जाहीर

 

एजेएफसी या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे पुरस्कार जाहिर करण्यात आले असून जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती राज्य पुरस्कार २०२२ जाहीर करण्यात आला आहे. याबाबत या संघटनेचे केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार यांनी माहिती दिली.

या वर्षी संघटनेच्या माध्यमातून रविवार दि. २७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता मालाड येथे संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येणार आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती राज्य पुरस्कार २०२२ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील दैनिक लोकसत्ता आणि रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार श्री. अभिमन्यू गणपत लोंढे यांना जाहीर करण्यात आला आहे.

नानासाहेब जोशी स्मृती राज्य पुरस्कार

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पत्रकार श्री. अतुल सुभाष होनकळसे, मधुकर लोंढे ससेमिरा ग्रामीण वार्ताहर स्मृती राज्य पुरस्कार,अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पत्रकार राहूल पुंडलिक कुलट,

शरददादा बोरकर स्मृती राज्य पुरस्कार , संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील पत्रकार श्री. युयुत्सु रमाकांत आर्ते, नवीनचंद्र सोष्टे स्मृती राज्य पुरस्कार,सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील श्री. गणेश भिमराव गोडसे, जीवनगौरव पुरस्कार,पनवेल तालुक्यातील जेष्ठ पत्रकार श्री. गणेश सखाराम कोळी यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, असे केंद्रीय सचिव

बाळकृष्ण कासार यांनी सांगितले.

अभिमन्यू लोंढे यांना यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट पत्रकार, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा वैनतेयकार मे द शिरोडकर व जीवन गौरव पुरस्कार, समर्थन संस्थेचा राज्यस्तरीय पर्यावरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!