राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून काम केले तर निश्चितपणे गावाचा विकास होऊ शकतो -दीपक केसरकर
सावंतवाडी,दि.१२मार्च (प्रतिनिधी)
सांगेली सावरवाड कुडतरकर टेंब ग्रामपंचायत कामासाठी दोन लाख रुपये आमदार निधीतून आपण देत आहे. विकास कामात मन मोकळे ठेवून राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून काम केले तर निश्चितपणे गावाचा विकास दूर नाही मला राजकारणात कधीही इंटरेस्ट नाही पण जनतेच्या सेवेसाठी मी आमदार झालो त्यामुळे जनतेच्या ज्या काही माझ्याबाबत अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
सांगेली सावरवाड बरोबरच पंचक्रोशीच्या पर्यटन विकास कृषी विकास साधला जाईल असे मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. सावरवाड कुडतरकर टेंब नूतन ग्रामसचिवालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या ग्रामपंचायतीच्या नूतन ग्राम सचिवालयचे उद्घाटन फीत कापून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजन म्हापसेकर व आमदार दीपक केसरकर माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती पल्लवी राऊळ ,पंचायत समिती सदस्या सुनंदा राऊळ, पंढरी राऊळ, जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, सरपंच सुप्रिया मडगावकर, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, उपसभापती शीतल राऊळ,माडखोल सरपंच संजय शिरसाट, गणपत राणे, बाबुराव कविटकर, मनोहर कुडतरकर, सूर्यकांत राऊळ, विठ्ठल डोईफोडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आमदार केसरकर पुढे म्हणाले, या पंचक्रोशीत कृषी व पशुसंवर्धन पर्यटन विकास होणार आहे सावंतवाडी कोल्हापूर असा मार्ग लवकरच होणार आहे सध्या शिवापूर सावंतवाडी मार्ग दृष्टिक्षेपात आहे या भागाचा पर्यटन विकास निश्चितच आहे असे ते म्हणाले माजी आमदार राजन तेली यांनी स्पष्ट केले सावरवड प्राथमिक शाळा एक वेगळेच रूप आहे गावाचा विकास ग्रामपंचायत आणि शाळा असून ही दोन्ही मंदिरे सुसज्ज आहेत या गावाचा आदर्श इतर गावांनी घेण्यासारखा आहे.
यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर पंढरी राऊळ यांनी या छोट्याशा गावाने ग्राम सचिवालय ची भव्य-दिव्य इमारत उभी केली आणि ज्यांनी जागा दिली त्यांचा गौरव केला आणि जे माजी सरपंच माजी ग्रामसेवक या सर्वांचे आठवण काढून जो गौरव केला आहे निश्चितच कौतुकास्पद आहे यावेळी भैरू कुडतरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रास्ताविक रवींद्र मडगावकर तर सूत्रसंचालन प्रशांत चव्हाण यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

