कोकण

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरा च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

सावंतवाडी दि.१०:-– ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कडून आयोजित महिला दिनाला गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत महिला दिन साजरा केला.महिला दिनाचा शुभारंभ सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरा च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सुदर्शन सभागृह मळेवाड येथे आयोजित महिला दिनाचा शुभारंभ सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना वैद्यकीय अधिकारी अदिति ठाकर यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी आरोग्य जपले पाहिजे असा सल्ला दिला.तर प्रवीण आपटे यांनी महिलांनी आपल्या घरातील मुलांवर चांगले संस्कार करणे काळाची गरज असून आपली संस्कृती टीकवणे गरजेचे आहे. संपूर्ण जगभरात आपली संस्कृती महान असून पाश्चिमात्य देशाची संस्कृती आपण अवलंबत असून त्यामुळे आपली संस्कृती लोप पावत चालली आहे.ती टिकवणे गरजेचे असल्याचे मत आपटे यांनी व्यक्त केले.तसेच सानिका शेवडे यांनी महिला संसाराचा गाडा हाकत असताना आपल्या आरोग्याकडे व आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक आजार बळावतात. यामुळे महिलांनी असे न करता संसाराचा गाडा हाकत असताना आपले आरोग्य आणि सकस आहार व शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी योग करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. सरपंच मिलन पार्सेकर यांनी महिलांना शुभेच्छा देत याहीपुढे महिलांसाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या कार्यक्रमात ग्रामपंचायतकडून पावसाळ्यात महिला बचत गटांना हळदीचे वाटप करण्यात आले होते. त्यातील जास्त उत्पन्न घेणाऱ्या महिला बचत गटांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. उपसरपंच हेमंत मराठी यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना महिला बचत गटांसाठी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला दिनाचे आयोजन गावात केले असून महिलांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल महिलांचे आभार मानत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महिलांनी वेगवेगळ्या योजना चा फायदा घेऊन आपला उत्कर्ष करणे गरजेचे असून महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे हे आवाहन केले. महिला दिनाचे औचित्य साधून महिलांची आरोग्य तपासणी करत असताना हिमोग्लोबिन तपासणी व ब्लड ग्रुप चेक अप करण्यात आले. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. ग्रामपंचायत ला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या प्रशांत आपटे व प्रवीणा आपटे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्राप्त करणाऱ्या अंगणवाडी सेविका मानसी सातार्डेकर यांचाही सत्कार माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य संदीप नेमळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खुशी मडूरकर यांनी आपल्या सुरेल आवाजात गीत सादर करून उपस्थित महिलांचे मनोरंजन करत वाहवा मिळविली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अदिती ठाकर, डॉ वैश्णवी जोशी, डॉ. विद्याधर सावंत, डॉ.गणपत टोपले, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, महेश शिरसाट, स्नेहल मुळीक, तात्या मुळीक, कविता शेगडे, सानिका शेवडे, ग्रामविस्तार अधिकारी अनंत गावकर, माजी सरपंच सचला केरकर, डाटा ऑपरेटर किरण कुंभार,अमित नाईक आदी उपस्थित होते. महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा फनी गेम, महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. पाककला स्पर्धेत 40 महिलांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर ठाकर व डॉक्टर जोशी यांनी केले.पाककला स्पर्धेत सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच फनी गेम मध्ये महीलांनी स्पर्धक वृत्ती दाखवत खेळ खेळला. डॉ. पुराणिक यांनी महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. पुराणिक यांचा सरपंच पार्सेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला दिन यशस्वी होण्यासाठी सीआरपी प्राची मुळीक, तेजश्री पेडणेकर, वैष्णवी मुळीक, श्वेता रेडकर, ईशा काळोजी, सरिता मसुरकर यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!