केशवसुत कट्ट्यांवर तुतारी शिल्प लोकार्पण सोहळा थाटात संपन्न
सावंतवाडी,दि.६मार्च
तुतारी शिल्प लोकार्पण सोहळ्यातून चांगली प्रेरणा घेऊन सावंतवाडी शहर सुंदर बनविण्यासाठी प्रयत्न करुया. सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या पासून सांस्कृतिक चळवळ उभी राहण्यासाठी राजाश्रय मिळाला,ती चळवळ पुन्हा एकदा वृध्दिंगत करण्यासाठी प्रयत्न करुया,असे प्रतिपादन माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले.
केशवसुत कट्ट्यांवर तुतारी शिल्प लोकार्पण सोहळा छानदार स्वरूपात झाला. यावेळी उपस्थित समाजातील सर्व घटकांचा सन्मान करण्यात आला. लोकसहभागातून तुतारी शिल्प उभारण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पुढाकार घेतला तो यशस्वीही केल्याने उपस्थितांनी कौतुक केले.
आमदार दीपक केसरकर म्हणाले, सावंतवाडीची संस्कृती लोपते कि काय अशा स्थितीत हा समारंभ होत आहे. सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत बापूसाहेब महाराज, श्रीमंत शिवरामराजे भोसले यांनी सांस्कृतिक चळवळ उभी राहण्यासाठी राजाश्रय दिला होता. केशवसुत कट्टा उभा राहिला मात्र तुतारी शिल्प उभारण्यासाठी बबन साळगावकर यांची संकल्पना मांडली, पुन्हा शिल्प उभारून लोकार्पण सोहळा साळगावकर यांच्या पुढाकाराने होत आहे. केशवसुत कट्ट्याचे नुतनीकरण करण्यासाठी मुख्याधिकारी यांना निर्देश दिले आहेत.
आमदार केसरकर म्हणाले,मोती तलावाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या कल्पना आराखडा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सावंतवाडी शहरात मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी नियोजन आहे. शहरात सांस्कृतिक वैभव आणण्यासाठी प्रयत्न करत राहीले पाहिजे. तुतारी फुंकूण्यासाठी बबन साळगावकर यांनी पुढाकार घेतला तशीच सांस्कृतिक चळवळ उभी राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सावंतवाडी शहरातील अनेक नाट्य कलावंत होते, म्युझियम उभे राहणार आहे. त्यामुळे जुन्या आठवणी जागवल्या पाहिजेत. गंजिफा म्युझियम उभे राहिले पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला आहे. राजवाडा जवळपास गंजिफा म्युझियम उभा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,सौ पल्लवी केसरकर, श्वेता शिरोडकर, राजन पोकळे, अन्नपूर्णा कोरगावकर, किर्ती बोंद्रे, डॉ जी ए बुवा, उषाताई परब, डॉ मधुकर घारपुरे,मुकंद वझे, जनार्दन पोकळे, विलास जाधव, सुरेश भोगटे, रवी जाधव, शैलेश नाईक,प्रा सुभाष गोवेकर, सुरेंद्र बांदेकर,खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, शुभांगी सुकी, अँड राजू कासकर,रमेश बोंद्रे, विकास गोवेकर, डॉ योगेश नवागुंळ, विठ्ठल कदम,प्रा. व्ही बी नाईक,भाई देऊलकर,डि के सावंत, सुधीर पराडकर, डॉ प्रवीणकुमार ठाकरे, अँड सुभाष पणदूरकर, मेघना राऊळ, सतीश बागवे, मोतीराम टोपले,अरूण पणदूरकर, जेष्ठ पत्रकार गजानन नाईक, अभय पंडित, सत्यजित देशमुख, संजय पेडणेकर, संदीप नाईक, दत्ताराम सडेकर, अँड शामराव सावंत, अफरोज राजगुरू,बाळ पुराणीक, कल्पना बांदेकर, बाळ बोर्डेकर, अँड निलीमा गावडे, तुषार वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
“पळस फुल्लो रानात” ही मालवणी कविता दादा मडकईकर यांनी सादर केली. वेदपाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी मंत्रघोष केला
डॉ जी ए बुवा,कवयित्री उषाताई परब, शैलेश नाईक, अँड सुभाष पणदूरकर, सचिन धोपेश्वरकर,भरत गावडे, शंकर प्रभू यांनी केशवसुत यांच्यावर विचार मांडले.
महीला खेळात सुवर्ण पदक प्राप्त केशर राजेश निर्गुण या विद्यार्थ्यांनीचा सत्कार माजी नगराध्यक्षा सौ पल्लवी केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पुढाकाराने तुतारी शिल्प उभारले आहे.
यावेळी आभार बबन साळगावकर यांनी मानले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शैलैश नाईक यांनी केले.

