कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

आरटीओ कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात येणार-परिवहन मंत्री अनिल परब

*🛑आरटीओ कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात येणार*

*🛑परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आरटीओ कार्यालयाला भेट*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्ग :२४ फेब्रुवारी*
महाराष्ट्र माझा आहे पण मी सिंधुदुर्गचा आहे. त्यामुळे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त राहणार नाहीत.याची खबरदारी घेतली जाईल. अशी ग्वाही परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी येथील सिम्युलेटर कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सिम्युलेटर कक्षाचे उद्घाटन परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेंडसिकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, वाहतूक संघटनांचे पदाधिकारी शिवाजी घोगळे, यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी सिम्युलेटर कक्षाचे उद्घाटन करून येथील सिम्युलेटर वाहन स्वतः चालउन त्याचे परीक्षण केले. त्यानंतर बोलताना मंत्री अनिल परब म्हणाले, येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर हे २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत असले तरी या ठिकाणी लवकरच पूर्णवेळ अधिकारी पाठवू. महाराष्ट्र माझा आहे, पण मी सिंधुदुर्गाचा आहे. त्यामुळे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची रिक्त पदे राहणार नाहीत. याची खबरदारी घेतली जाईल. वाहन चालक संघटनांचे प्रश्न तसेच वाहतुकीचे प्रश्न सोडवितानाच अपघात कमी व्हावेत. यासाठी आपले प्रयत्न राहतील. वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी येथील घाट मार्गांचे काम पूर्ण करून ते लवकरच सुरू करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.या जिल्ह्यातील वाहतूकी बाबतचा कुठलाही प्रश्न प्रलंबित राहणार नाही. जिल्ह्याची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची जबाबदारी माझी राहील. अशी ग्वाही यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. तसेच या ठिकाणी उद्घाटन झालेल्या सिम्युलेटर वाहनाचा उपयोग वाहनचालकांनी घ्यावा. वाहन चालक परवाना चुकीच्या माणसाला मिळू नये, अपघात होऊ नये म्हणून हे सिम्युलेटर वाहन फार महत्त्वाचे आहे. असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला अनुभव
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांचा आज वाढदिवस होता. तसेच ते २८ फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत. यासाठी मंत्री अनिल परब यानी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर म्हणाले, मला या जिल्ह्यात काम करण्याचा कमी कालावधी मिळाला. येथे काम करण्याचा चांगला अनुभव आहे खरोखरच या जिल्ह्यात यापूर्वीच यायला पाहिजे होते .असे त्यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!