कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

आंतरजिल्हा बदली व रिक्त जागा भरण्यासाठी कोकणभवनसमोर २८ रोजी धरणे आंदोलन

*🛑आंतरजिल्हा बदली व रिक्त जागा भरण्यासाठी कोकणभवनसमोर २८ रोजी धरणे आंदोलन*

*🛑जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांची माहिती;कोकणातील शिक्षक सहभागी होणार*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली:२४फेब्रुवारी*
कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी , रायगड , ठाणे , पालघर जिल्हयांपैकी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हयातील सद्यस्थितीत शिक्षकांच्या 14 ते 15 टक्के रिक्त असलेल्या जागा शिक्षक भरतीने तात्काळ भरण्यात याव्यात आंतरजिल्हा बदली झालेल्या 2016 पासूनच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 107 व रत्नागिरी जिल्हयातील 280 शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे , आंतरजिल्हा बदली टप्पा क्र. 5 मध्ये कोकण विभागाचा प्राधान्याने समावेश व्हावा, RTE कायद्याला छेद देणारे शासनाचे 9 जानेवारी 2019 चे पत्र रद्द करावे , पदवीधर शिक्षक , केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत या मागण्यांसाठी शासनाचा लक्षवेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवनसमोर 28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत राज्यव्यापी धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हयातील शेकडो आंतरजिल्हाबदली बांधव व शिक्षक समितीचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली .
यावेळी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर , जिल्हासरचिटणीस सचिन मदने , राज्यसहसचिव नामदेव जांभवडेकर , कोकणविभाग उपाध्यक्ष शरद नारकर , कार्याध्यक्ष नारायण नाईक , प्रवक्ता सुनिल चव्हाण कणकवली शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव,श्रीकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते .
सिंधुदुर्ग रत्नागिरी , रायगड , ठाणे , पालघर या कोकण विभागातील जिल्हयांमध्ये आंतरजिल्हा बदली संबधाने गेल्या 6 वर्षापासून विविध गंभीर प्रश्न निर्माण झालेले असून या प्रश्नांबाबत संघटनेने सातत्याने जिल्हास्तर ते राज्यस्तरापर्यंत पाठपुरावा केलेला आहे . परंतु सिंधुदुर्गरत्नागिरी जिल्हयांमध्ये आंतरजिल्हा बदली मधील सुमारे 450 शिक्षक सन 2016 पासून कार्यमुक्तच्या प्रतिक्षेत आहेत .
या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांचे प्रमाण 10 % पेक्षा जास्त आहे . त्यामुळे शासनाच्या आंतरजिल्हाबदली टप्पा क्र 5 मध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हयांचा समावेश होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या जिल्हयांमधील कार्यरत आंतरजिल्हाबदली शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे . याबाबत संघटनेची दि 16 फेब्रुवारी 2022 रोजी कोकण विभागातील 5 जिल्हयांच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची राज्याध्यक्ष यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली . या बैठकीत ग्रामविकास विभागाकडून आंतरजिल्हाबदली बाबत कोकण विभागातील सिंधुदुर्ग्र रत्नागिरी जिल्हयांवर कमालीचा अन्याय झालेला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटनेच्यावतीने 28 फेब्रुवारी 2022 रोजी कोकण भवनसमोर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कायदा सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता याला बाधा न पोचवता कोव्हिड 19 संदर्भातील नियमांचे पालन करुन तीव्र धरणे व निदर्शने आंदोलन छेडण्याबाबत निर्णय घेण्यात आला . या आंदोलनात कोकणविभागासह राज्यातील हजारो आंतरजिल्हा बदली शिक्षक सहभागी होणार आहेत .
आंदोलनातील प्रमुख मागण्या – 1 ) कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यातील कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या आंतर जिल्हा बदली पात्र शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे 2 ) RTE act 2009 मधील तरतुदीनुसार रिक्त पदांवर हंगामी शिक्षणसेवक भरण्यास परवानगी देण्यात यावी . 3 ) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दि 9 जानेवारी 2019 चे RTE act 2009 ला छेद देणारे परिपत्रक रद्द करावे . 4 ) कोकणविभागातील जिल्हयांना 10 % ची अट रद्द अगर शिथील करावी . 5 ) आंतर जिल्हा बदली टप्पा .5 मध्ये कोकण विभागातील जिल्हयांचा समावेश करावा,या मागण्या असल्याचे नितीन कदम यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!