कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या चोरट्या दारु वाहतुकीला वरदहस्त कोणाचा?*

*🛑 गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या चोरट्या दारु वाहतुकीला वरदहस्त कोणाचा?*

*🛑 राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन चोरट्या दारू विक्री बाबत कठोर पावले का करत नाहीत?*

*🛑 दारू धंद्यात महाविद्यालयीन पिढी बरबाद होताना फक्त उघड्या डोळ्याने बघायचे का?*

*🛑 प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या या अधिकाऱ्यांची डोकी ठिकाणावर कधी येणार?*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ संपादकीय : सीताराम गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-०९ फेब्रुवारी :-*

संसाराचा सर्वनाश करे दारू बाटलीला स्पर्श नका करू, अशी जाहिरात गेली अनेक वर्ष राज्य शासनामार्फत दूरदर्शन वर प्रसारित होत असली तरी हेच राज्य शासनाचे अधिकारी अवैद्य दारू धंद्यांना प्रोत्साहन देऊन मोठ्या प्रमाणात मलीदा खावून गब्बर झाले आहेत, तर दारू पिणार्यांची कुटुंबे देशोधडीला लागली आहेत.
गोव्यातून येणारी विषारी दारू पिऊन अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, याबाबत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चालणे वारंवार उठाव केल्यानंतर थोड्याफार प्रमाणात चाप बसला मात्र ती तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी होती, याची जाणीव आता होऊ लागली आहे, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी आमच्या लीखाना नंतर गोव्यातून येणाऱ्या अवैध दारू बाबत कठोर पावले उचलून वेगवेगळ्या भागांतील भरारी पथके सिंधुदुर्गात दाखल झालीत, गेल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत कोरोना च्या काळात पोलीस व उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे सात ते आठ कोटी रुपयांची अवैद्य दारू जप्त करण्यात आली, याचा अर्थ अशाप्रकारची करोडो रुपयाची दारू अवैध मार्गाने महाराष्ट्राच्या इतरत्र जिल्ह्यात पोहोचून तेथील नागरिकांचा बळी होती हे सिद्ध झाले आहे.
गोव्यात पाच ते सहा रुपयाच्या किमतीला मिळणारे एक कॉटर सिंधुदुर्गात ७५ ते १०० रुपयाला विकले जाते एका कॉटर मागे किती मलिदा असते ते यावरून दिसून येते, गोव्यात गोवा बनावटी दारू बनवण्याचे अनेक कारखाने आहेत,, काही वर्षांपूर्वी अशा कारखान्यांवर धाड टाकून गोवा प्रशासनाने ते कारखाने बंद केले होते, अशाच कारखान्यातून ही विषारी दारू सिंधुदुर्गात व महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात पोहोचवून तेथील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला जातो, याबाबत आम्ही वारंवार उठाव केला होता, महाविद्यालय मुलांना या धंद्यात झटपट श्रीमंत होण्याच्या नादात ओढून कुटुंबाच्या कुटुंबे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र या दारू माफियांनी आखले असल्याचे त्यावेळी आम्ही उघड केले होते, गोव्यातून सिंधुदुर्गात दिवसाकाठी लाखो रुपयांची दारू आणली आणि जाते ती कुठून येते कशी येते याची संपूर्ण माहिती संबंधित यंत्रणेला असते, मात्र मोठ्या प्रमाणात मिळणार हप्ता आहे त्यामुळे ही यंत्रणेतील अधिकारी सुशेगात एखादा प्राणी खाऊन सुशेगाद पडलेल्या अजगरासारखे निवांत राहतात याची आम्हाला चीड आहे.
जागोजागी पोलिस प्रशासनाची तपासणी नाकी असताना ती फक्त हप्ता गोळा करण्यासाठीच आहेत काय? याचा विचार आता प्रशासनाने केला पाहिजे, सिंधुदुर्गात सुमारे २०० गोव्यातून अवैद्य पुरवठा करणारे दारू माफी आहेत हे सगळे दारू अभियान गब्बर झाले आहेत, पैशाच्या जीवावर वाट्टेल ते करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, एवढे सर्व माहिती असूनही आम्ही या विरोधात सातत्याने आवाज उठवला होता, सावंतवाडीतील मूळ दारू माफियांनी आता आपला मोर्चा दुसरीकडे वळवून आपल्या बगल बच्चानाज्ञया धंद्यात घुसवले आहे व नवनवीन पंटर तयार होऊन महिन्याकाठी लाखो रुपये कमवत आहेत .
कमी वयात पैशाच्या जीवावर भर रस्त्यात धिंगाणा घालने, मारामारी करणे ,असे प्रकार शहरात घडू लागले आहेत व पोलीस ठाण्यावर याबाबत तक्रार द्यायला गेल्यावर विरोधी पार्टी कोण असे पहिल्यांदा विचारले जाते व त्या वेळी या दारू माफीयांची नावे पुढे येतात त्यावेळी पोलिस तक्रार घ्यायला धजावत नाहीत ही शोकांतिका आहे. सावंतवाडी तालुक्यात गावोगावी नाक्यानाक्यावर दारू विक्री केली जाते ,काही गावांमध्ये तर हॉटेल मध्ये परमीटअसल्यासारखे ग्राहकांना बसवून दारू दिली जाते, याबाबत संबंधित गावच्या पोलीस पाटील व‌ पोलीस बीड अमलदार यांना सर्व माहिती असूनही केवळ हप्ता मिळतो म्हणून ही मंडळी डोळेझाक करून गाव उध्वस्त करीत आहेत, याची आम्हाला चीड आहे.
‌. पोलिस अधीक्षकांनी याबाबत बैठक घेऊन पोलीस पाटील व प्रत्येक गावच्या बीट अंमलदार यांना सक्त सूचना करायला हवी की ज्या गावात दारू धंंदा आढळून येईल त्या गावातील पोलीस पाटील व बीट अंमलदावर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल व ज्यावेळी असे घडेल ्यावेळी खर्‍या अर्थाने प्रत्येक गावातील दारूधंदे बंद होतील असे आमचे ठाम मत आहे, अमाप पैशाच्या हव्यासापोटी दारू धंद्यात उतरलेले अजय, विजय, सुजय सोन्या ,बाप्या ,तात्या ,मोरया, यांची बेडकी ज्यावेळी पोलीस उचलतील व जेलची हवा खावी लागेल त्यावेळी खऱ्या अर्थाने गोव्यातून सिंधुदुर्गात येणारी दारू बंद होईल.

*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य

_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._

*💁‍♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*

💁‍♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.

*उमेश गावडे : 9421082622*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!