🛑 कोलगाव चव्हाटावाडी ग्रामस्थ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा – सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न..
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-०९ :-* रविवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी कोलगाव चव्हाटावाडी ग्रामस्थ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा – सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोलगाव चव्हाटावाडी शाळा नं. ३ येथे रक्तदान शिबीर पार पडले. कोलगाव चव्हाटावाडी येथे प्रथमच रक्तदान शिबीर पार पडले आणि या शिबिरामध्ये तरुण रक्तदात्यांनी, आजूबाजूच्या गावातील रक्तदात्यांनी तसेच विशेष म्हणजे महिलांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे रक्तदान करुन शिबीर यशस्वी केले. या शिबिराच्या यशस्विततेसाठी चव्हाटावाडी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले, तसेच बचत गटाच्या भगिनींनी सुद्धा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष योगदान दिले.
यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाशजी तेंडोलकर यांनी कोलगाव चव्हाटावाडी ग्रामस्थांनी प्रथमच आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरासाठी त्यांचे कौतुक केले व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या रक्तदान, देहदान, अवयवदान, रुग्णमित्र आणि मित्रसंस्था या पंचसूत्रीविषयी सविस्तर विवेचन केले तर जिल्हासचिव किशोरजी नाचणोलकर यांनी रक्ताची गरज असणार्या कोणत्याही आणि जिल्हाभरात आणि त्याबाहेर कोठेही असणार्या रुग्णाची रक्ताची गरज शक्य तेवढ्या ताबडतोब पूर्ण करण्याची ग्वाही दिली, तसेच सुधीरजी पराडकर यांनी आपल्या रक्तदान चळवळीत आजवरचे आपले महत्त्वपूर्ण अनुभव कथन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. मेघःश्याम काजरेकर यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नॅशनल फेडरेशन आॅफ व्हाॅलंटरी ब्लड डोनर्स आॅर्गनायझेशन (इंडिया) या संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हासचिव श्री. किशोरजी नाचणोलकर यांची निवड झाल्याने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या रक्तदान शिबिराचे वेळी हे शिबीर आयोजित करण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे चव्हाटावाडी ग्रामस्थ संदीप सावंत, सुहास सावंत, प्रशांत गोवेकर, शिक्षक चाॅंद मुंजेवार सर हे सर्वजण तसेच सरपंच संतोष राऊळ, ज्यैष्ठ नागरीक प्रकाश सावंत, प्रा. मेघःश्याम काजरेकर, रक्तमहर्षी आनंदजी वेंगुर्लेकर, माजी सैनिक रक्तदाते तुषार परुळेकर, नेत्रचिकित्सक सिद्धराम नागुरे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जिल्हासचिव किशोर नाचणोलकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, सहखजिनदार अमेय मडव, सदस्य एकनाथ चव्हाण, संजय नाईक, सावंतवाडी तालुका कार्यकारिणीचे अॅडव्होकेट संदीप तारी, सुधीर पराडकर, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, तालुका सचिव बाबली गवंडे, शिक्षिका पूनम नाईक, बचतगटाच्या सर्व माताभगिनी, रक्तदाते तसेच कोलगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन, प्रास्ताविक शिक्षिका पूनम नाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे यांनी केले.
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

