कणकवली नगरपंचायत कर्मचार्यांनी काल दुपारपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन आज अखेर मागे..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२२: नगरपंचायत कर्मचार्यांनी काल दुपारपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन आज अखेर मागे घेतले. आमदार नीतेश राणे यांनी न.पं.कर्मचार्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पालिका कर्मचारी संघटनेचे नेते आणि नगरपंचायत कर्मचार्यांशी चर्चा केली.
नगरपंचायतीचे लिपिक सतीश कांबळे यांना विरोधी पक्षनगरसेवक रूपेश नार्वेकर यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाली होती. तशी तक्रार श्री.कांबळे यांनी काल मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्याकडे केली. तर नगरसेवकाकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या सर्व कर्मचार्यांनी काल बुधवारी दुपारपासून काम बंद आंदोलन छेडले होते. आज सकाळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पालिका कर्मचारी संघटनेचे नेत्यांशी चर्चा केली. तसेच आपल्या दालनात नगरपंचायत कर्मचार्यांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार नीतेश राणे यांनी आवाहन मागे घेण्याचे आवाहन केल्याची माहिती दिली. याखेरीज एका नगरसेवकाच्या चुकीच्या वागण्याची शिक्षा संपूर्ण शहराला मिळत आहे. आपण सर्वजण शहरवासीयांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे आता आंदोलन मागे घ्यावे. यापुढे कुठल्याही कर्मचार्यावर अन्याय झाला तर आम्ही त्याविरोधात खंबीर भूमिका घेऊ अशीही ग्वाही श्री.नलावडे यांनी दिली. यानंतर नगरपंचायत कर्मचार्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजित मुसळे, नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे किशोर धुमाळे, मयूर शिंदे, मनोज धुमाळे, प्रियांका सोनसुरकर, सतीश कांबळे, अमोल भोगले, विभव करंदीकर आदी उपस्थित होते.
*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*
🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..
*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*
🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*
*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*
*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*
*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*
*📱Head 0ffice : 8600666111*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

