कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

🛑 आ. भास्करराव जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे कुणबी समाजाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित..

 

 🛑 बेदखल कुळांच्या प्रश्नी दीर्घकाळ रखडलेला समितीचा अहवाल शासनाला सादर..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

 ✍ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-२३ :- कोकणातील, विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो बेदखल कुळांचा प्रश्न गेल्या ६०-६५ वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत सातत्याने विधानसभेत आवाज उठवून संघर्ष करणाऱ्या आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे. कुळांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी २०१४ मध्ये नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला सादर होत नव्हता. सतत विविध आयुधांच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर समितीने अहवाल सादर केला आहे, असे लेखी उत्तर राज्याचे महसूलमंत्री ना. श्री. बाळासाहेब थोरात यांनी आ. श्री. जाधव यांच्या प्रश्नाला दिले आहे. यावर या अहवालातील शिफारशी कुळांना न्याय देणाऱ्या असून त्या शासनाने स्वीकाराव्यात यासाठी आता आपण विधानसभेत संघर्ष करू, अशी प्रतिक्रिया आ. श्री. जाधव यांनी दिली.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेदखल कुळांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठविल्यानंतर दि. १२ सप्टेंबर २०१४ रोजी शासनाने या दोन्ही जिल्ह्यातील कुळांच्या समस्यांचे सर्वकष अभ्यासाकरिता तत्कालीन कोकण आयुक्त श्री. राधेशाम मोपलवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने त्यावेळी प्रत्येक तालुक्याचा दौरा केला आणि कुळांच्या समस्या जाणून घेतल्या. परंतु, काही वर्ष उलटली तरी समितीचा अहवाल व शिफारशी शासनाला सादर होत नव्हत्या. त्यासाठी गेल्या ३-४ वर्षांपासून आमदार श्री. भास्करराव जाधव हे तारांकित प्रश्न व अन्य आयुधांच्या माध्यमातून प्रयत्न करीत होते. दि. १९ जानेवारी २०१७ रोजी समितीने शासनाला सादर होऊनही तो गुलदस्त्यात ठेवण्यात आला होता. अखेर मागील अधिवेशनात आ. श्री. जाधव यांनी दाखल केलेल्या प्रश्नावर सदर अहवाल शासनाला प्राप्त झाल्याचे आणि त्यामध्ये कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत, याबाबत सविस्तर उत्तर महसूलमंत्री ना. थोरात यांनी दिले आहे.

 

*समितीच्या अहवालातील शिफारशी*

१. महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियमांच्या विविध कलमांत सुधारणा करण्याचे समितीने प्रस्तावित केले आहे.

२. पीकपाहणीच्या नोंदी अद्ययावत ठेवणे

३. कुळकायद्यांच्या प्रकरणातील दावे चालविणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे.

४. सर्व प्रलंबित दावे एक वर्षात निकाली काढण्यासाठी अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देणे

५. कातकऱ्यांच्या घरठाणांबाबत यापूर्वी सादर केलेल्या अहवालातील शिफारशींप्रमाणे बेदखल कुळांच्या घरठाणांच्या जागांबाबत शिफारस आहे.

 

*कुणबी समाजाला न्याय मिळवून*

*देणार : आ. भास्करराव जाधव*

१९५७ साली कुळांना मालकी हक्क प्राप्त करून देणारा कायदा मंजूर करण्यात आला. मालकाची जमीन पिढ्यान् पिढ्या प्रत्यक्ष कसणाऱ्या कुळांना मालकी हक्काने मिळावी अशी तरतूद या ‘कुळ कायद्या’त करण्यात आली. या कायद्यात २००१ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. कायद्यातील ७०(ब) हे कलम दुरुस्त झाले. २००४ मध्ये काँग्रेस आघाडी सरकारने कायद्याच्या ७०(ब) कलमात पुन्हा दुरुस्ती केली गेली. तरीही बेदखल कुळांच्या हक्क नोंदणीचा प्रश्न पुढे गेला नाही आणि मूळ समस्या तशीच कायम राहिली. चाळीस टक्क्यांहून अधिक संख्येने असलेल्या कुणबी समाजाचा हा प्रश्न आहे. जमीन नावावर नसल्याने घरबांधणी, कृषीविषयक योजनांचा लाभ इत्यादींपासून हा समाज वंचित आहे. परंतु आता मोपलवार समितीचा अहवाल आणि त्यातील शिफारशी शासनाने स्वीकाराव्यात व कुळांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी आणि त्याचबरोबर कोकणातील कुणबी समाजाच्या विकासासाठी शामराव पेजे समितीच्या अहवालातील शिफारशीही शासनाने स्वीकाराव्यात यासाठी येत्या काळात आपण प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी व्यक्त केली.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!