आरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अंध-अपंग, मूकबधिर कर्णबधिर अस्थिव्यंग विशेष तपासणी..

🛑 तज्ञ डॉक्टरांकरवी मिळणार दाखला..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-२३ :- सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अंध-अपंग, मूकबधिर कर्णबधिर अस्थिव्यंग विशेष तपासणी होणार आहे.

मंगळवार दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी होणार असलेल्या या तपासणी वेळी तज्ञ डॉक्टर दाखला देणार आहेत.

हा उपक्रम जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्याकडून आयोजित करण्यात आला आहे. या दाखल्याचा फायदा वेगवेगळ्या शासकीय कार्यक्रमासाठी होणार असून प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अशा दाखल्याचा फायदा होणार असून मासिक मानधन एक हजार रुपये मिळणार आहे. यासाठी तालुक्याच्या तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊन सेतू मार्फत 50 हजार च्या आत उत्पन्नाचा दाखला लाभार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे.हा दाखला संजय गांधी योजनेअंतर्गत कार्यरत कक्षामध्ये जाऊन अर्ज भरून अर्जासोबत रेशनिंग कार्ड व आधार कार्ड तसेच पासपोर्ट साईज फोटो, बँकेचे पासबुक सदरील दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. या विशेष कार्यक्रमात संजय गांधी योजनेअंतर्गत हजार रुपये मानधन मिळणार असून याचा फायदा सर्व गोरगरीब जनता यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

या दाखल्यामुळे शासकीय रुग्णालयात लाभ मिळणार असून एसटी प्रवास खर्च सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहे.समाजातील जाणकारांनी त्याचा सर्वसामान्य जनतेसाठी लाभ देण्याचे कार्य करावे तसेच समाजातील सेवाभावी कार्यकर्त्यांनी जनतेला लाभ घेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.याबाबतची अधिक माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्याकडे मिळणार असून

याचा सर्व जनतेने घ्यावा असे आवाहन राजेंद्र प्रभाकर मसुरकर,जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस यांच्याशी संपर्क क्र 9422435760 येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!