काडवली झगडेवाडी येथील स्मशान शेडच्या स्ट्रक्चरचे काम पूर्ण
🛑काडवली झगडेवाडी येथील स्मशान शेडच्या स्ट्रक्चरचे काम पूर्ण
⚫मुंबई येथील दीप जनसेवा समितीचे सुनील साळुंखे परिवार व सामाजिक कार्यकर्ते संतोष सावर्डेकर यांचे सहकार्य तर ग्रामस्थांचे महत्त्वपूर्ण श्रमदान
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:ओंकार रेळेक
🎴चिपळूण,ता२२:- दीप जनसेवा समिती मुंबई, चिवेली येथील सुनील साळुंखे परिवार, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष सावर्डेकर यांच्या सहकार्याने तर ग्रामस्थांच्या श्रमदानातून काडवली झगडेवाडी (ता. खेड) येथे स्मशान शेडच्या स्ट्रक्चरचे काम पूर्ण झाले आहे. एकंदरीत सामूहिक योगदानातून हे काम पूर्णत्वास गेल्याने येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
काही महिन्यांपूर्वी काडवली झगडेवाडी येथे दीप जनसेवा समिती यांच्या सहकार्याने तर सामाजिक कार्यकर्ते संतोष सावर्डेकर यांच्या पुढाकारातून येथील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी येथील ग्रामस्थांनी समिती व संतोष सावर्डेकर यांच्याकडे स्मशान शेड ची मागणी केली होती. आपली मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही समितीतर्फे विलास व दीपक साळुंखे यांनी दिली होती. यानुसार सामाजिक कार्यकर्ते संतोष सावर्डेकर यांनी येथील स्मशान शेड स्ट्रक्चर साठी जांभा, सिमेंट व वाळू असे साहित्य दिले. यातून येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून चबुतरा बांधला तर दीप जनसेवा समितीच्या माध्यमातून सुनील साळुंखे परिवाराने स्ट्रक्चर साठी लागणारे आयबीम लोखंडी साहित्य दिले. तर विलास व दीपक साळुंखे यांनी स्ट्रक्चर बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. एकंदरीत या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून झगडेवाडी येथील स्मशान शेडच्या स्ट्रक्चरचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे. येथील ग्रामस्थांनी शब्द टाकला काय आणि दीप जनसेवा समिती व संतोष सावर्डेकर यांनी तात्काळ शब्द पूर्ण केल्याने येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या काही वर्षांतील आमची मागणी पूर्ण झाल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
*झगडेवाडी येथील ग्रामस्थ व दीप जनसेवा समितीचे कौतुक-संतोष सावर्डेकर*
विशेष म्हणजे येथील ग्रामस्थांनी दाखवलेली एकी व केलेले श्रमदानाबाबत संतोष सावर्डेकर यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले आहे. ग्रामस्थांच्या एकीतून अवघड काम देखील सोपे होऊन जाते. हे येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. अशीच एकी सर्वांनी दाखवली पाहिजे, असे संतोष सावर्डेकर यांनी आवाहन केले आहे. तर दुसरीकडे दिप जनसेवा समितीने कोरोना काळापासून सामाजिक दायित्व जपून मोठा आदर्श निर्माण केला आहे. कोरोना काळात चिवेली, काडवली, बोरगाव, तनाळी, मार्गताम्हाणे, बामणोली आदी गावात ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले तर महापूर काळात देखील याच पद्धतीने काम करून पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. तर चिवेली घोणसरे फाटा येथे पंचक्रोशीतील प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था केली. एकंदरीत ही समिती गावागावात जाऊन उपक्रम राबवणारी एकमेव समिती आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तर आता काडवली झगडेवाडी येथील स्मशान शेड स्ट्रक्चर पूर्णत्वास जाण्यासाठी मोठे योगदान दिले. याबद्दल श्री. सावर्डेकर यांनी या समितीचे सुनील साळुंखे यांना धन्यवाद दिले आहेत.
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*