नगरसेवक रुपेश नार्वेकर यांची लिपिक सतीश कांबळे यांना मारण्याची धमकी व अर्वाच्चभाषेत अपमानास्पद वागणूक..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२१: नगरपंचायतच्या साईनगर गार्डन पाहणी दरम्यान मुख्याधिकारी विनोद डवले आणि लेखापाल प्रियांका सोनसुरकर यांच्या समक्षच नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी आपणाला कानाखाली मारण्याची धमकी देत, अर्वाच्च भाषा वापरून अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार नगरपंचायतचे लिपिक सतीश कांबळे यांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्याकडे केली आहे.
दि. २० ऑक्टोबर रोजी कणकवली शहरातील गार्डनची स्थिती पाहण्यासाठी विरोधी गटाचे नगरसेवक मुख्याधिकारी डवले आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह गेले होते. गार्डन पाहणी करत असताना नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी आपणास उद्देशून कानाखाली मारेन अशी धमकी दिली. अर्वाच्च भाषा वापरून अपमानास्पद वागणूक दिली. याबाबत न्याय मिळावा अशी मागणीही लिपिक कांबळे यांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांकडे केली आहे. कणकवली नगरपंचायत मधील यांत्रिकी व पर्यावरण विभागाचे कनिष्ठ अभियंता पद रिक्त आहे. या पदाचा कार्यभार लिपिक सतीश कांबळे यांच्याकडे आहे. आरोग्य विभागाकडील गार्डन देखभाल दुरुस्ती, विद्युत विभाग, आस्थापना विभागाकडील कामे, कोव्हीड-१९ अंतर्गत कामे आपण करत असल्याचे कांबळे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. अतिरिक्त कार्यभार सांभाळत असताना तांत्रिक चुका झाल्यास मला जबाबदार धरू नये. सदरच्या कामांबद्दल तांत्रिक दृष्ट्या योग्य कारणे मी देऊ शकत नाही, सबब माझ्याकडील अतिरिक्त कार्यभार सक्षम अधिकाऱ्याकडे देण्याची विनंती लिपिक कांबळे यांनी केली आहे. मुख्याधिकारी आणि लेखापाल यांच्या समक्षच लोकप्रतिनिधी जर कर्मचाऱ्यांना मारण्याची धमकी देत असतील तर कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही काय? प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्याधिकारी डवले आता आपल्या कर्मचाऱ्याला न्याय देणार काय? नगरपंचायतचे नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडे लिपिक सतीश कांबळे याना कसा न्याय देणार? हाच प्रश्न सध्या नगरपंचायत कर्मचारी आणि जनतेतून विचारला जात आहे.
*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*
🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..
*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*
🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*
*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*
*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*
*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*
*📱Head 0ffice : 8600666111*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

