माजगाव येथे इनोव्हा कारचा अपघात;गाडीच्या काचा फोडून जखमीना काढले बाहेर
सावंतवाडी, दि.२१:- राज्य महामार्ग वर माजगाव कासारवाडा आज दुपारी २.३० च्या सुमारास येथे गाडीवरील ताबा सुटल्याने इनोव्हा कारचा अपघात घडला..ही कार पर्यटकांची असल्याची माहिती मिळत आहे गाडी क्रमांक MH 02 CH 9211 असा आहे.ह्या अपघातात तिघे ते चौघे जण जखमी झाले आहे तर गाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.. माजगाव ग्रामसुरक्षा दल तसेच अशेले डिसोझा यांनी घटना स्थळी धाव घेत जखमीना गाडीच्या काच फोडून सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे.पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आहेत.

