अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला
🟣 अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी :- संजय भाईप
🎴 बांदा- बांदा दशक्रोशीत गेले दहा दिवस मेघगर्जनेसह कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे कापलेल्या भात पिकाचे अतोनात नुकसान झाले. तर उभे असलेले नाचणी पिक आडवे होऊन गळू लागले आहेत.विलवडे,वाफोली,कोनशी,इन्सुली,भालावल,सरमळे, असनिये येथे हातीतोंडी आलेल्या नाचणी पिकाला शेतात कोंब आल्याचे चित्र आहे.अवकाळी पाऊस सुरु असल्याने शेर्ले व मडुरे चावडी परिसरात भातकापणी लांबणीवर गेल्याने कापणी केलेले भात पाण्यात गेल्याने शेतकरी चितांतूर झाला आहे. सलग आठ महिने सुरू असलेला पाऊस शेतकऱ्याची मात्र काही केल्या पाठ सोडेना. या अगोदर कोरोनाचे संकट, चक्रीवादळ,महापुर यासारखी शेतकरी संकट झेलत आहे. निदान आता तरी अधिकाऱ्यांनी शेतात येऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी. तसेच पिकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सातत्याने कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने आंबा, काजू,सुपारी मोहोरावर विपरीत परिणाम झाला आहे. पावसाच्या आस्मानी संकटाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हातीतोंडी आलेल्या भात शेती, नाचणी कोंब येऊन प्रचंड नुकसानी झाली.नोव्हेबर महीना संपत आला तरी थंडी पडत नसल्याने बागायतदार धोक्यात आले. एकापाठोपाठ नव्या संकटाचा सामना करताकरता शेतकर्यांचे कंबरडे मोडले.उदरनिरवाह चालवायचा कसा या विवंचनेत सापडला आहे. मोठी संकटे झेलत कोकणातला शेतकरी खबिरपणे सामना करताना दिसत आहे. शासनाने अवकाळी पावसात भातशेती,नाचणी, काजू,आंबा फळबागेचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
________________________
*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*
*👨🏼💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*
MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा
*👨🏻🎓👨💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._
*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022
*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

