कोकणक्राइममहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

अखेरीस बेवारस आढळलेली दुचाकी गाडी मालकाच्या ताब्यात

🛑अखेरीस बेवारस आढळलेली दुचाकी गाडी मालकाच्या ताब्यात

🛑 मळगांव पोलीस पाटील यांचे यशस्वी प्रयत्न

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी:-सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,ता२०,:- ‌बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या एका दुचाकी गाडी बाबत मागील आठवडाभरा पासून मळगांव व पंचक्रोशीत उलटसूलट चर्चा सुरु होती. गाडी कोणाची आहे? गाडी मालक कोण? गाडी इथे उभी करुन ठेवण्याचे कारण काय? असे नानाविविध प्रश्न उपस्थित होत होते. मात्र ही चर्चा संपुष्टात आणण्यासाठी मळगांव गावच्या दक्ष पोलीस पाटील रोशनी जाधव यांनी प्रयत्न करुन या अनोळखी दुचाकीच्या मालकाचा शोध लावण्या बरोबरच ती गाडी त्याच्या ताब्यात पोहचविण्यास अखेरीस यश मिळविण्याची कौतुकास्पद कामगिरी केली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मागील 7 ते 8 दिवसांपासून मळगांव जोशीवाडी, झाराप पत्रादेवी हायवे येथे ही दुचाकी उभी करुन ठेवलेली होती. या गाडी मालकाचा ठाव ठिकाणा लागत नव्हता यामुळे पोलीस पाटील रोशनी जाधव यांनी , “सदर गाडी मळगाव हायवे दीपक जोशी यांच्या दुकानाच्या बाजूला गेले 7 ते 8 दिवस लावलेली आहे.कोणाला काही कल्पना असल्यास संपर्क साधावा ” असे आवाहन केले होते. जाधव यांच्या आवाहनाला यश आले. या गाडीच्या मालकाचा पत्ता लागला व ही गाडी मणेरी येथील गुरुदास गवस यांच्या मालकीची असल्याचे समजले. त्या नंतर पोलीस पाटील जाधव यांनी या माहिती ची खातरजमा करण्यासाठी आंबेरी पोलीस पाटील यांना संपर्क साधला. आंबेरी पोलीस पाटील जाधव यांनी योग्य सहकार्य केले आणि ही गाडीचे मालक कामत यांच्या पर्यंत पोहचून त्यांना ही गाडी मडगांव येथून घेऊन जाण्यास भाग पाडले. बेवारस गाडी मालकीची आवळा पटवून ही गाडी बुधवारी त्याच्या ताब्यात देण्यात आली असून गाडी मालकीची शोध लावण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मळगांव पोलीस पाटील जाधव यांनी आंबेरी पोलीस पाटील रामा गुळेकर जाधवयांचे आभार मानले आहेत. दरम्यान या अनोळखी दुचाकी गाडी च्या बेवारस स्थितीत असण्यामागचे कारणही समोर आले असून दुचाकी मालक यांनी ही गाडी मळगांव येथील कोणा मॅकेनिक कडे दुरुस्ती ला देण्यासाठी येथे उभी करुन ठेवली होती, अशी माहिती दिल्याचे समजल्याने या प्रकरणाचा सुखद शेवट झाला आहे.

________________________

*🏝️जागा भाड्याने देणे आहे*

*🛣️मुंबई-गोवा महामार्गालगत*

👉🏻कसाल एस टी स्टँड 🚍बाजूला

🏥क्लिनिकसाठी 900 स्केअर फुट जागा भाडेने देणे आहे. 🗺️

*सुनंदा अपार्टमेंट आनंदसाई मेडिकल शेजारी रावळ कॉम्प्लेस,कसाल*

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📱आमचा संपर्क-9422393027*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!