खुल्या निबंध लेखन स्पर्धेत निर्जरा पाटील, उभादांडा हायस्कुलची पूर्वा राज्याध्यक्ष प्रथम
🛑खुल्या निबंध लेखन स्पर्धेत निर्जरा पाटील, उभादांडा हायस्कुलची पूर्वा राज्याध्यक्ष प्रथम
🛑युवा सप्ताह अंतर्गत नेहरू युवा केंद्र व वेताळ प्रतिष्ठानचे आयोजन
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग,ता२०,: युवक व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने व सामाजिक कार्यकर्ते विकास शांताराम घारे यांच्या सहकार्याने स्वामी विवेकानंद जयंती निमित्त्त युवा सप्ताह अंतर्गत प्रतिभागीता दिवसाच्या औचित्याने आयोजित खुल्या व शालेय गटातील निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खुल्या गटातून निर्जरा पाटील व शालेय गटातून पुर्वा राजाध्यक्ष प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. ‘हरवले कुटुंब,सापडले वृद्धाश्रम ‘ या खुल्या गटातील ज्वलंत विषयावर तर ‘काटकसर नव्या युगाचा वसा’ या शालेय गटातील विषयावर स्पर्धकांनी आपली मतं मांडली.
खुल्या गटातून निर्जरा संजय पाटील यांनी निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक क्रमांक पटकावला, तर द्वितीय अश्विनी आत्माराम तुळसकर तृतीय सुकांती साखराम पालकर (वैभववाडी) क्रमांक प्राप्त करून यश संपादन केलं.
शालेय गटातून प्रथम पुर्वा विनोद राजाध्यक्ष(उभादांडा हायस्कूल),द्वितीय प्रज्ञा दत्ताराम रेडकर(शिरोडा हायस्कूल),तृतीय प्रणया पांडुरंग राऊळ(नेमळे हायस्कूल) यांनी यश संपादन केलं.
मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि चषक देऊन गौरविण्यात आले.निबंध स्पर्धेचे परिक्षण निवृत्त मुख्याध्यापक अजित राऊळ (मुंबई) यांनी केले.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

