एक दिवस ही न वापरलेल्या बोलेरो गाडीचे १८ लाखाचे कर्ज अण्णांच्या डोक्यावर..
_*🛑 एक दिवस ही न वापरलेल्या बोलेरो गाडीचे १८ लाखाचे कर्ज अण्णांच्या डोक्यावर..*_
_*🛑 म्हातारपणात हे कर्ज फेडू कसे? मुलांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे ठेवून जाणेही अशक्य..*_
_*🛑 राजकारणात उभी हयात घालवून अनेक शिष्य तयार केलेले अण्णा आज पडले अडगळीत..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-२९ :-* शिवसेना, भाजप ,काँग्रेस, या पक्ष्यांच्या जिल्हाध्यक्षांचे गुरु असलेले ज्येष्ठ शिवसैनिक वसंत उर्फ अण्णा केसरकर सध्या एक दिवसही न वापरलेल्या बोलोरो गाडी चे १८ लाखाचे कर्ज डोक्यावर असल्याने व जमिनीवर जप्तीची टांगती तलवार असल्याने म्हातारपणात ढसा रडत आहेत,त्यांच्या या अश्रू ची किंमत कोणाला मोजावी लागेल हे येणारा काळच ठरवेल असे बोलले जात आहे.
ज्यांनी जिल्हाप्रमुख असताना नारायण राणे यांना सिंधुदुर्गात आणून कणकवली येथे उमेदवारी द्यावी अशी शिफारस शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे केली ते अंण्णा आज अडगळीत पडले आहेत, काँग्रेस सेवादल चे पदाधिकारी असताना त्यांना काॅग्रेस पक्षांच्या वतीने ना,नारायण राणे यांच्या मार्फत गाड्या देण्यात आल्यात, मात्र त्या गाड्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आतच पोलिसांनी जप्त केल्या,कारन होते त्यावेळचे भाजपचे अतुल काळसेकर यांनी इन्कम टॅक्स विभागाकडे केलेली तक्रार,प्रकरण आपल्या अंगाशी येऊ नये म्हणून त्या गाड्यांचे एका दिवसात कर्ज प्रकरण सिंधुदुर्ग बँकेत करण्यात आले व त्यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष होते राजन तेली, ते कर्ज आपल्याला भरावे लागणार नाही आम्ही पक्ष मार्फत पैसा देऊ असे त्यावेळी वसंत केसरकर यांना सांगण्यात आले आणि त्यांनी कर्ज अर्जावर स्वाक्षरी केली.
सदरची बोलोरो गाडी एक दिवस सुद्धा न वापरता आज त्या गाडीचे १८ लाखाचे कर्ज वसंत केसरकर यांच्या डोक्यावर आहे, म्हातारपणात मुलांच्या डोक्यावर हे १८ लाखाचे कर्ज ठेवून आपल्याला जावे लागणार या विचारानेच अण्णा ढसाढसा रडत आहेत, सर्वच पक्षांमध्ये अण्णांची शिष्य मंडळी मोठ मोठ्या पदावर आहेत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते ,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, हे वसंत उर्फ अण्णा केसरकर यांचे शिष्य, त्यांच्याच तालमीत वाढलेले, मात्र त्यांचे गुरु आज अडगळीत पडून १८ लाखाचे कर्ज डोक्यावर आले आहे, या कर्जाची टांगती तलवार डोक्यावर असल्याने अण्णांना दिवस-रात्र सध्या सारखीच वाटते, आपण हे अर्ज कसे भेटणार या विवंचनेत अण्णा असल्याने जाईल त्या माणसासमोर ते आपली व्यथा सांगून ढसाढसा रडत आहेत,अण्णांच्या अश्रूची किंमत आता कोणाला मोजावी लागेल हा येणारा काळच ठरवेल ,मात्र ज्याने राजकारणात आपली उभी हयात घालवली अनेक शिष्य तयार केले, त्या अण्णांवर न वापरलेल्या गाडीचे १८ लाखाचे कर्ज डोक्यावर ठेवून त्यांना चिरडून टाकण्याचा हा प्रयत्न तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे.
*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

