कोकणसिंधुदुर्ग

सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी काही मिनिटात लावला हरवलेल्या मोबाईल चा शोध….

*सावंतवाडी ता.२२-:* शहरातील एका फोटो स्टुडिओ मधून चोरीस गेलेला मोबाईल सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी काही मिनिटातच शोधून काढत मूळ मालक स्वाती भाईडकर यांना परत दिला आहे. स्वाती यादव यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की भाईडकर या पतीसोबत सायंकाळच्या सुमारास शहरातील एका फोटो स्टुडिओ मध्ये गेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांचा अँड्रॉइड मोबाईल गहाळ झाला मोबाईल गहाळ झाल्याचे भाईडकर यांच्या लक्षात येतात त्या मोबाईल वर संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र संबंधित चोरट्याने तो कॉल उचलला नाही यामुळे भयभीत होत त्यांनी पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांना याबाबत कल्पना देतात त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातील काम बाजूला ठेवत हरवलेला तो मोबाईल ट्रॅक केला घटनास्थळी गेल्यावर पहिल्यांदा त्या मोबाइल चे लोकेशन येथील समाज मंदिर परिसरात दिसून आले त्यानंतर त्या ठिकाणी पोहोचतात त्या चोरट्यांनी पुन्हा तो मोबाईल घटनास्थळापाशी नेऊन ठेवला पोलिसांच्या हालचाली पाहून या चोरट्यांनी पुन्हा तो मोबाईल घटनास्थळी ठेवला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे मात्र तब्बल दोन दिवसांपूर्वी घेतलेला तो मोबाईल पुन्हा भाईडकर यांच्या स्वाधीन होताच भाईडकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!