नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या पाठपुराव्याने बिरोडकर टेंब येथे साकारली ओपन जिम
*सावंतवाडी, दि१४डिसेंबर:-* बिरोडकरटेंब येथे दहा गुंठे परिसरात साकारलेल्या भव्य दिव्य गार्डनमध्ये स्थानिक नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या पाठपुराव्यामुळे ओपन जिम साकारली आहे सर्वात जास्त दहा प्रकारचे वेगवेगळ्या व्यायामाचे साहित्य या ठिकाणी बसविण्यात आले आहे.
यासाठी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी प्रयत्न केल्याचे नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी स्पष्ट केले, बिरोडकर टेंब वर असलेल्या दहा गुंठे जागेमध्ये हे भव्य दिव्य असे गार्डन आहे,व याच गार्डन मध्ये ओपन जिम करण्याचा शब्द बाबू कुडतरकर यांनी दिला होता, नगराध्यक्ष संजू परब यांनीही ओपन जिम साठी सहकार्य केले.
आजूबाजूच्या परिसरातील युवकांना ,महिलांना ,ज्येष्ठ नागरिकांना,याचा फायदा होणार आहे, त्यामुळे बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाने नगरसेवक बाबू कुडतरकर ,आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष संजू परब यांचे आभार मानले आहेत.

