नौदलात आत्मनिर्भर भारतच्या धोरणास अनुसरून सिंधुदुर्ग ; माणगावचा सुपुत्र लेफ्टनंट कमांडर सुरज वारंग यांनी दाखवीले कौशल्य
_*🛑 नौदलात आत्मनिर्भर भारतच्या धोरणास अनुसरून सिंधुदुर्ग ; माणगावचा सुपुत्र लेफ्टनंट कमांडर सुरज वारंग यांनी दाखवीले कौशल्य*_
_*🛑 नौदल दिनी “नौसेना अध्यक्ष प्रशंसा पदक”देऊन केले सन्मानीत..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी,दि-०५ :-*
नौदलात लेफ्टनंट कमांडर पदावर कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यातील सुरज जयसिंग वारंग यांनी कौतुकास्पद कामगिरी केली असल्याने आज नौदल दिनी (दि.४ डिसेंबर ) “नौसेना अध्यक्ष प्रशंसा पदकाने” सन्मानित करण्यात आले. त्यांनी आत्मनिर्भर भारतच्या धोरणास अनुसरून विमान मेंटेनन्स वर कौशल्य दाखविले.
एम. आय. जी. २९ के या नेव्हीतील विमानाच्या मेंटेनन्स बाबत सुविधा भारतात नव्हती. विमानांचे मेंटेनन्स रशिया कडून करून घेतले जात होते. विमानांच्या ओव्हर ऑल फॅसिलिटी भारतात सेटअप करण्याबाबत लेफ्टनंट कमांडर सुरज वारंग यांनी प्रयत्न केला व त्यात तो यशस्वी झाला. आज विमान मेंटेनन्स करिता रशियावर अवलंबून राहावे लागत नाही. नेव्हीच्या विमानांचे ओव्हर ऑल फॅसिलिटी सेटअप भारतात होत आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची बचत होत आहे. लेफ्टनंट कमांडर सुरज यांच्या या व नौलातील अन्य कामाची दखल घेऊन नौदलाने त्यांना ” नौसेना अध्यक्ष प्रशंसा पदक ” देऊन सन्मानित केले आहे.
माणगाव येथील अँड. जयसिंग वारंग व प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली वारंग यांचा सुरज हा सुपुत्र आहे. सुरज यांची पत्नी सौ. ज्युही वारंग नौदलामध्ये लेफ्टनंट कमांडर आहे. सुरज यांचे एसएससी पर्यंतचे शिक्षण माणगाव येथील वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात झाले. लहानपणापासून त्याला विमानाबद्दल आकर्षण होते व त्याला पायलट होण्याची इच्छा होती असे त्यांच्या वडिलांनी सांगितले.
सुरज याने एराॅनॉटिकल इंजिनीअर्सची पदवी पुणे येथे प्राप्त केली त्यानंतर यूपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड( एस.एस.बी) मार्फत निवड झाली. नौदलाच्या आयएनए इजमल्ला केरळ येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नौदलाच्या अॅव्हीएशन केडरमध्ये निवड झाली. त्यानंतर मीग २९ के या लढाऊ विमानाचे इंजिनिअरिंग ऑफिसर म्हणून प्रशिक्षण पूर्ण करून त्याची निवड फ्रन्टलाईन स्वाॅर्डन मध्ये गोवा येथे करण्यात आली.
या नियुक्ती दरम्यान सूरज यांनी आय एन एस विक्रमादित्य वर यशस्वी सेवा पूर्ण केली. सध्या तो एरोडायनॅमीक स्पेशलायझेशन करीता आय आय टी कानपूर येथे दोन वर्षासाठी प्रशिक्षण घेत आहे. कमी कालावधीच्या सेवाकाळात सूरजने नौदलात कौतुकास्पद भरारी घेतली आहे. मेक इन इंडियाचा तो पुरस्कर्ता असून त्याने आपल्या सेवा काळात भारतात विमाने बनविणे व त्यांचे मेंटेनन्स करणे करीता प्रयत्न करावे अशी आपली इच्छा असल्याचे त्यांच्या मातोश्री सौ. स्वप्नाली वारंग यांनी बोलताना सांगितले.
आपल्या मुलाच्या या कर्तबगारीमुळे निश्चितच आमचे ऊर भरून आले आहेत अशी प्रतिक्रिया त्यांच्या मातापित्यांनी व्यक्त केली. तसेच आपली सूनही नौदल लेफ्टनंट कमांडर पदावर कार्यरत आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले.
*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

