वारस नोंदणीसाठी विधवा तसेच पालक गमावलेल्या मुलांची गावनिहाय यादी द्यावी…निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड
🛑वारस नोंदणीसाठी विधवा तसेच पालक गमावलेल्या मुलांची गावनिहाय यादी द्यावी…निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग२९- कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांबाबत तसेच विधवांचे वारस नोंदणीसाठी गाव निहाय, तालुका निहाय यादी द्यावी. तहसिलदारांच्या माध्यमातून वारस नोंद केली जाईल, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केली.
कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव डी.बी. म्हालटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता बढे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना शिरदावडे, महिला अत्याचार निवारण कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आढावा दिला. जिल्ह्यामध्ये एक पालक मयत बालके 233 असून दोन्ही पालक मयत बालके 14 असे एकूण 247 बालके आहेत. 568 विधवा असून 250 गृहभेटी पूर्ण झाल्या आहेत. अनाथ प्रमाणपत्रासाठी 14 प्रस्ताव उपआयुक्तालयाकडे सादर करण्यात आले आहेत. या पैकी 8 प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत संबंधित बालकांची पोस्टात खाती उघडण्यात येत आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड म्हणाले, अगंणवाडी सेविका, पर्यावेक्षिका यांनी गृह भेटी देऊन विधवांबाबतच्या केलेल्या कार्यवाहीचा अहवाल द्यावा. बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी प्राधान्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विविध लाभ देण्याबाबत तहसिलदार कार्यालयाकडे पाठपुरावा करावा. पालक गमावलेल्या बालक आणि विधवा यांना सर्व प्रकारचे शासकीय लाभ देण्यासाठी प्रत्येक विभागाने प्राथम्याने कार्यवाही करावी. यासारखे पुण्याचे काम दुसरे नाही, असेही ते म्हणाले.
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*