जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासकीय भात खरेदीला मुदतवाढ मिळावी
🛑जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासकीय भात खरेदीला मुदतवाढ मिळावी
🛑कंझ्युमर्सचे माजी चेअरमन प्रमोद गावडे यांची पालक मंत्र्यांकडे मागणी
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी-सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,दि,१८: जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजनेची संपत असलेली मुदत वाढवून मिळावी अशी मागणी सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीचे माजी चेअरमन प्रमोद गावडे यांनी केली आहे. ही मुदत ३१ जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देण्यात यावी अन्यथा त्यामुळे पालकमंत्र्यांनी यात जातीने लक्ष घालावे व शेतकर्यांचे नुकसान टाळावे अशी विनंती या मागणीत गावडे यांनी केली आहे.
शासकीय आधारभूत भात खरेदी करताना ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले त्यांना भात खरेदी करता येत होती. यासाठी पिक पेरा नोंद असलेला सातबारा आवश्यक होता. या पार्श्वभूमीवर बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन न केल्याने तसेच पिक पेरा नोंद सातबारावर नसल्याने अनेक शेतकऱ्यांना भात खरेदी करण्यास देण्यात आली नव्हती.
त्यामुळे अनेक शेतकरी सध्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, भात खरेदी ची मुदत ३१ जानेवारीला संपत आहे. काही शेतकऱ्यांना फेब्रुवारी पर्यंतची मूदत देण्यात आली आहे. मात्र, भात खरेदी न झाल्यास साठा झाल्यामुळे त्यांच्या भारताचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून भात खरेदी योजनेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी प्रमोद गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

