आंबोली-चौकुळ डार्क फॉरेस्ट हॉटेल वरील कारवाई म्हणजे पराचा कावळा

*_🛑 आंबोली-चौकुळ डार्क फॉरेस्ट हॉटेल वरील कारवाई म्हणजे पराचा कावळा_*

*_🛑 धंद्याच्या चढाओढीतून नवं उद्योजकाला संपविण्याचा घाट*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ संपादकीय:-सीताराम गावडे*

*🎴सावंतवाडी,दि,:-२३ नोव्हेंबर*
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली चौकुळ येथील डार्क फॉरेस्ट या हॉटेलवर काल रात्री टाकण्यात आलेली धाड म्हणजे पराचा कावळा करू स्थानिक उद्योजकाला त्रास देण्याचा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
या युवकांनी मेहनतीने एका माळरानावर नंदनवन फुलवले ,याची पोटदुखी काहीजणांना होती त्या पोटदुखीतूनच हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे, काल सायंकाळी सात च्या सुमारास डार्क फॉरेस्ट हॉटेलवर एक टुरिस्ट बस आली त्या बसमध्ये पंचवीस ते तीस लोक होती, त्यात विवाहित महिला ,युवतीही होत्या ,त्याने संपूर्ण रिसॉर्ट बुक केले ,त्यावेळी मालकाने त्याने सोबत काय ,काय वस्तू आणल्या हे पाहिले नाही व तशी पाहण्याची गरज नसते, मात्र ती कंपनीची टूर असल्याने मालक ही बिनधास्त होता.
रात्री आठ च्या सुमारास त्यांनी आपल्या रूम मध्ये नाच,गाणी सुरुवात केली ,मात्र मालकाने बंदिस्त रूममध्ये हे नाच-गाणी होत असल्याने त्याला हरकत घेतली नाही, त्याच दरम्यान नऊच्या सुमारास त्या ठिकाणी पोलीस हजर झालेत, त्यावेळी त्या पर्यटकांकडे देशी दारू आढळून आली, शिवाय गाण्याच्या ठेक्यावर काही पर्यटक नाचत होते, त्यामुळे पोलिसांनी विनापरवाना मद्य बाळगणे, कोवीड चा नियम मोडणे ,अश्लील नृत्य करणे ,अशी कलमे लावून संबंधित ब हॉटेल मालकासह चौतीस जणांना ताब्यात घेतले, हॉटेल मालकाने गैरकृत्य केले असेल तर त्याचे आम्ही समर्थन करणारच नाही मात्र द्वेषापोटी अशा नव उद्योजकाला कोणी अडकवून संपवण्याचा घाट घालत असेल तर अशा उद्योजकाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू असे या निमित्ताने स्पष्ट करत आहोत.
एका सुशिक्षित बेरोजगार युवकाने आपल्या गोव्यातील भावाच्या मदतीने माळरानावर नंदनवन फुलवले, देशी ,विदेशी ,पर्यटक त्याठिकाणी आकर्षिले जाऊ लागलेत, निसर्गसंपन्न अशा चौकुळ गावात डार्क फॉरेस्ट हाॅटेल ने अल्पावधीतच नावलौकिक मिळवले, देशाच्या कानाकोपऱ्यात डार्क फॉरेस्ट चे नाव गेले, पर्यटकांची पसंती डार्क फॉरेस्ट हाॅटेल होऊ लागली, याचा पोटशूळ काही जणांना उठला, व त्यांनीच अशा प्रकारचे कृत्य केले असे आमचे ठाम मत आहे.
जिल्ह्यातील हाताच्या बोटावर मोजणाऱ्या हॉटेल मध्ये अशी बेकायदा कामे होत नसतील मात्र सर्रास हॉटेलमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात, एखाद्या कंपनीने आयोजित केलेला सेमिनार मध्ये गाण्याच्या ठेक्यावर नाचणाऱ्या युवती हे तर रोजचेच झाले आहे ,मात्र या हॉटेल च्या बाबतीत मात्र ते निमित्त ठरले , दारू पिण्याचा परवाना नाही,कोवीड काळात कार्यक्रमाची परवानगी नाही, दारू पिऊन अश्लील हावभाव करणे ,आधी कलमे लावण्यात आलीत, मात्र अश्लील हावभाव करून त्यांनी कोणाच्या मनात लज्जा उत्पन्न केली याचे कारण मात्र अनुत्तरितच राहिले, कारण बंदिस्त खोलीत सुरु असलेले नाच गाणे याचा त्रास सार्वजनिक होत नाही म्हणून त्या बंदीस्त खोलीतील नाच गाण्याला ते कलम लागते का याचा विचार होणे गरजेचे होते.
मात्र या संपूर्ण प्रकारात पराचा कावळा करून त्यां उद्योजक हॉटेल मालकाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला,आम्ही सिंधुदुर्गात येणारीअवैध दारु, चरस ,गांजा ,यांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल याबाबत सातत्याने लिहीत असतो, मात्र यावर कारवाई करायला किंवा असे धाड नाट्य करायला पोलिसांना वेळ मिळत नाही ,मात्र स्थानिक युवक आपल्या श्रमातून एखादा व्यवसाय उभा करतो त्याला बदनाम करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावतात याचेच नवल वाटते, सिंधुदुर्गात येणारा चरस ,गांजा ,नेमका कुठून येतो त्याचा मोहरक्या कोण याची सर्व माहिती पोलिसांजवळ उपलब्ध असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई करायला हेच हात का धजावत नाहीत हा आमचा प्रश्न आहे, एवढीच तत्परता जर पोलिसांनी या अंमली पदार्थांच्या विरोधात दाखवली असती तर सिंधुदुर्ग जिल्हा अमली पदार्थांच्या विळख्यात सापडला नसता.
एखादा चांगला चाललेला व्यवसाय अशा प्रकारचे गालबोट लावून बंद करण्याचा तर प्रयत्न नाही ना असा संशय आमच्या मनात येऊ लागला आहे आहे किंवा ज्या पोटशूळ उठलेल्या इसमाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली तेव्हा संबंधित पोलिसांनी याची खातरजमा करून संबंधित हॉटेल मालकाला याबाबत तंबी दिली असती तर आज त्यांची अब्रू वेशीवर टांगली गेली नसती मात्र असे न करता कायद्याचा धाक दाखवून वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल करून एका स्थानिक उद्योजकाला संपवण्याचा घाट घातला जातो त्यावेळी या घटनेची प्रचंड चीड येते.
डार्क फॉरेस्ट हॉटेल च्या मालकाने या घटनेने खचून न जाता या पुढे आलेल्या पर्यटकांची कसून चौकशी करावी व नंतरच त्याला प्रवेश घ्यावा जेणेकरून असे बालंट पुन्हा येणार नाही व पोटशूळ उठलेल्या असंतूष्ट आत्म्याना अशी उठाठेव करायची संधीही मिळणार नाही एवढे मात्र निश्चित..
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!