सावंतवाडीत २८ नोव्हेंबर रोजी विदयार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा
*_🟣सावंतवाडीत २८ नोव्हेंबर रोजी विदयार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा_*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*✍️ प्रतिनिधी :-प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी,दि,:-२० नोव्हेंबर* कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त मुक्ताई अकॅडमीने 19 वर्षे वयोगटातील मुलां-मुलींसाठी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे.रविवार दि.28 नोव्हेंबर रोजी सावंतवाडीतील श्री.पंचम खेमराज महाविदयालयातील स्पोर्ट्स हाॅलमध्ये सकाळी 09.30 वाजता स्पर्धेला सुरुवात करण्यात येणार आहे.विजेत्यांसाठी रु.5,500 रकमेची 20 बक्षिसे,5 ट्राॅफीज,15 मेडल्स आणि प्रशस्तिपत्रं ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा राणीसाहेब शुभदादेवी भोंसले,प्रमुख पाहुणे डाॅ.संजीव गवंडे,सिधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक श्री.सुर्यकांत पेडणेकर,महेंद्र आर्ट्सचे श्री.महेंद्र चव्हाण,
नॅशनल आर्बिटर श्री.श्रीकृष्ण आडेलकर,अॅकेडमीच्या संचालिका सौ.स्नेहा पेडणेकर,संचालक श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात येईल.
स्पर्धा मुख्य गट, 19 वर्षे मुले, 15 वर्षे मुले, 11 वर्षे मुले, 19 वर्षे मुली, 13 वर्षे मुली या सहा गटात घेण्यात येईल.मुख्य गटात 5 क्रमांकांना अनुक्रमे रु.1,500, रु.1,000, रु.700, रु.500, रु.300 रोख बक्षिसे आणि ट्राॅफी,प्रशस्तीपत्रं देण्यात येईल.इतर प्रत्येक गटात 3 क्रमांकांना अनुक्रमे रु.200, रु.100 रोख बक्षिसे आणि गोल्डन,सिल्वर,ब्राँज मेडल,प्रशस्तीपत्रं देण्यात येईल.
राष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे 5 किंवा जास्त राउंड्समध्ये स्पर्धा खेळविण्यात येईल.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रं देण्यात येतील.स्पर्धकाने स्पर्धेसाठी येताना आधारकार्ड आणावयाचे आहे.परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील.स्पर्धेसाठी नाव नोंदणी कौस्तुभ पेडणेकर मोबाईल क्रमांक 8007382783 यांच्याकडे करावयाची आहे.
________________________
*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*
*👨🏼💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*
MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा
*👨🏻🎓👨💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._
*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022
*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

