आशिष झांटये चे ‘नीट’ यश सिंधुदुर्गासाठी अभिमानास्पद!

▪️माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस यांच्या वतीने सत्कार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴मालवण,दि.१८: देश स्तरावर वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परिक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकासह देशात १९ क्रमांक प्राप्त आशिष अविनाश झांटये या मालवणच्या सुपुत्राचे यश आम्हा सिंधुदुर्ग वासीयांसाठीही अभिमानास्पद आहे. अशी कौतुकाची थाप देत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस यांच्या वतीने आशिष याचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, दिल्ली एम्स मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशाचे धेय्य घेऊन आशिष यांने मिळवलेले यश विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत असेच आहे. आतापर्यंत मिळवलेल्या यशात गुरुजन व आई-वडील यांचा सिंहाचा वाटा आहे. वैद्यकीय क्षेत्रात आपण धेय्य निश्चित केले आहे. त्यातही आपण यश संपादन कराल. असे कौतुकोद्गार भोसले, डांटस यांनी आशिष याच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस यांच्यासह राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, शहर अध्यक्ष आगोस्तिन डिसोझा, बाबू डायस, किरण रावले, यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे दीपक चव्हाण, देवानंद लोकेगावकर, विश्वनाथ डोर्लेकर, सुरज गवंडी, वसंत हडकर, सतीश ढोलम, स्वप्नील केळुसकर, संजय लुडबे, सुरेश वरक, संतोष गावकर, महेंद्र गावडे आदीसह आशिष याचे वडील डॉ. अविनाश झांटये व आई डॉ. शिल्पा झांटये उपस्थित होते.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!