नेत्यांच्या कड्यांना इस्त्री करून पद मिळवणा-यांनी टिका करताना आपण कोणावर टिका करतो याचे भान ठेवावे नाहीतर शिवसेना महिला आघाडी भानावर आणेल…-: तालुका प्रमुख स्नेहा दळवी
*🟣नेत्यांच्या कड्यांना इस्त्री करून पद मिळवणा-यांनी टिका करताना आपण कोणावर टिका करतो याचे भान ठेवावे नाहीतर शिवसेना महिला आघाडी भानावर आणेल…-: तालुका प्रमुख स्नेहा दळवी*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग :-*
*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-१६ नोव्हेंबर*
मुळात तुमच्या नेत्यांनी स्वतःच्या काळात फक्त आणि फक्त स्वतःचाच विकास केला. अडीच दशक जिल्ह्यावर राज्य करीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व सत्तास्थाने उपभोगून जिल्ह्यात विकास करता आला नाही आणि म्हणूनच ज्यांना स्थानिक जनतेने वारंवार घरी बसवले त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर विकासासंबंधी टीका करावी हे हास्यास्पदच म्हणावे लागेल अशी टीका सौ स्नेहा दळवी यांनी केली आहे.
यांच्या नेत्यांनी विकास केला असता तर आज जिल्हा वासीयांनी त्यांना असे नाकारले नसते ! परंतु ज्यांना फक्त स्वतःचाच विकास करावयाचा असतो ते कधीच समाजाच्या सुख-दुखाशी बांधील नसतात. म्हणूनच शिवसेना किंवा इतर कुणीही जिल्ह्यात एखादी संस्था सुरू करू इच्छित असेल तर त्याला हीच मंडळी विरोध करणार आणि सत्तेचा वापर करून त्यात खोडा घालणार. उदाहरण द्यायचे झालेच तर जिल्ह्यात होणारा साखर कारखाना कुणामुळे अडचणीत आला ? जिल्ह्याला मिळाले स्वतःचे हक्काचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कुणी अडचणीत आणले आहे ? चिपी विमानतळाचे काम कोण रखडवत होते ? या आणि अश्या अनेक गोष्टी जिल्हावासीयांना ज्ञात आहेत आणि त्याच बरोबर पालकमंत्री . उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात होणारी विकासकामे सुदधा जिल्हा अनुभवत आहे.असेहु सौ दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे
व्यक्तीकडे स्वतः करण्यासारखे काहीच नसले किंवा आपल्या नेत्यांनी काय काम केले हे सांगण्यासारखे एक ही काम नसले की बेलगाम आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे !*तुमची सत्ता असलेल्या जिल्हापरिषदेला दिलेला 43 कोटींचा निधी जो जिल्हा परिषदेने परत पाठवला तो पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठीच दिला होता त्यांच्या घराच्या विकासासाठी नाही याची तुम्हाला आठवण करून देते.
मॅडम ज्या महिलांचं नेतृत्व आपण करता गॅसच्या वाढत्या दरांनी त्यां महिलांचं कंबरडं मोडलं आहे. बेरोजगारीने देशाचा तरुण हतबल झालाय देशाच्या आर्थिक घसरणीत आणि महागाईचा जो उचांक गाठत केंद्राने जो “विकास” केलाय तो कमी करण्यासाठी मॅडम ने काही प्रयत्न केले असल्यास आम्हाला ते ऐकायला आवडेल. बाकी आता केंद्रीय मंत्रिपद मिळालंय जिल्ह्यात उद्योग आणाल तेव्हा आणा तेवढी तोक्ते वादळाची राज्यशासनाकडून भरपाई मिळाली केंद्राचा प्रतिनिधी आहे असं सांगून दौरा करणाऱ्या मंत्र्यांनी केंद्राची मदत तेवढी सिंधुदुर्ग वासीयांना मिळवून द्यावी एवढी माफक अपेक्षा असा चिमटाही प्रसिध्दी पत्रकातून काढला आहे.
*👇👇सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*
*👨🏼💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*
MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा
*👨🏻🎓👨💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._
*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022
*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*