कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

आमदार दीपक केसरकर हे आंतरराष्ट्रीय दलाल…नगराध्यक्ष संजू परब यांचा पलटवार

🛑निवडणुकीत केसरकरांसाठी मी एकटाच पुरेसा सुसंस्कृत सावंतवाडीकरांची केसरकरांनी केली बदनामी..संजू परब

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ ब्यूरो न्युज :-कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी- आमदार दीपक केसरकर यांनी आजवर सिने अभिनेता जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, नाना पाटेकर तसेच विविध नेते-अभिनेते व व्यावसायिक यांना मतदार संघातील जमिनी विकण्याचे काम केले असून ते आंतरराष्ट्रीय दलाल म्हणून प्रसिद्ध आहेत. दलालीतून मिळालेल्या घरातच ते राहतात त्यामुळे कमिशनवर कोण जगतो हे सावंतवाडीकरांना चांगलेच ज्ञात आहे, असा पलटवार नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. दरम्यान, आगामी निवडणुकांत केसरकरांसाठी मी एकटाच पुरेसा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संजू परब यांनी केसरकर यांच्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. मी बिल्डर असून व्यावसायिक आहे त्यामुळे कमिशनची आम्हाला गरज नाही. उलट केसरकरांचा कोणता व्यवसाय आहे हे त्यांनी जाहिर करावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
आ. दीपक केसरकर यांनी पाणी निचरा व डास निर्मूलनासाठी करोडो रुपयांचा निधी दिल्याची केलेली घोषणा ही पूर्णपणे फसवी असून त्यांनी यासाठी एक रुपयाही दिला नसल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. मागील चार वर्षात त्यांनी शहरासाठी केवळ तीस लाख रुपयांचा निधी दिला आहे. यातून केसरकर किती खोटे बोलतात याचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे केसरकरांना आपण टामटूम आमदार का म्हणतो याचा खुलासा ही झाला असल्याची टीका संजू परब यांनी यावेळी केली.
सावंतवाडीतील जनता पैसे घेऊन मते देते असं सांगून सावंतवाडीकरांचा केसरकरांनी घोर अपमान केला आहे. सावंतवाडीकर आपली मते विकतात अशा शब्दात केसरकरांनी उभ्या महाराष्ट्रात सावंतवाडीकरांची बदनामी केली आहे. त्यामुळे सावंतवाडीकर नागरिक त्यांना कधीही माफ करणार नाहीत व याचे उत्तर सावंतवाडीकर त्यांना आगामी निवडणुकांमधून नक्कीच देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दोडामार्ग रस्ता प्रश्न केसरकरांना सोडवता न आल्यानेच नितेश राणेंना यावे लागले
नगराध्यक्ष संजू परब यांचे प्रत्त्युत्तर
आमच्या नेत्यांवर टीका कराल तर सर्व पोलखोल करू

आमदार नितेश राणे हे भाजपचे महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत. त्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात. दोडामार्ग रस्त्याचा प्रश्न तुम्हाला आमदार व राज्यमंत्री असतानाही सोडवता आला नाही. त्यामुळेच आमदार नितेश राणे यांना त्या ठिकाणी यावे लागले. केसरकरांनी कणकवलीतील दाखविलेले फोटो हे देखील खोटेच आहेत. टामटूम आमदार असलेल्या केसर करांवर आता कोणाचाच विश्वास राहिला नाही. त्यामुळे यापुढे त्यांनी आमच्या नेत्यावर केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही. योग्य वेळ येताच केसरकरांचा सर्व पोलखोल करू, असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिला.

________________________

*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*

*👨🏼‍💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*

MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा

*👨🏻‍🎓👨‍💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*

_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._

*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022

*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!