कोकणमुंबईसामाजिक

सार्वजनिक स्थळांवर नमाज का ? ’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

_*🛑 ‘सार्वजनिक स्थळांवर नमाज का ? ’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद ..*_

_*🛑 सार्वजनिक ठिकाणांवरील अवैध नमाजपठण थांबविण्यासाठी गुरुग्रामच्या हिंदू नागरिकांप्रमाणे लढा देण्याची आवश्यकता ; नीरज अत्री*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्ग, दि-१२ :-* पोलिस आणि प्रशासन राजकीय नेत्यांच्या इशार्‍यांवर चालतात, हे देशभरात गेली अनेक वर्षे आपण अनुभवत आहोत. सार्वजनिक ठिकाणी होणारे अवैध नमाजपठण हे देशभरातील सभ्यतेला आव्हान आहे. गुरूग्राममध्ये उघडपणे रस्त्यांवर सुरू असलेल्या अवैध नमाजपठणाला तेथील हिंदू नागरिकांनी तसेच संघटनांनी ज्या प्रकारे विरोध केला, तसा विरोध देशभरात सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन *विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष श्री. नीरज अत्री* यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ *सार्वजनिक स्थळांवर नमाज का* ?’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
‘वोट बँके’च्या राजकारणासाठी संविधानाचे पालन न करता विशिष्ट समाजाला सूट दिली जात आहे, हे गेली ७० वर्षे या देशात होत आहे. भारतीय संविधानानुसार ‘कोणालाही बाधा उत्पन्न होईल, अशी कृती करण्याचा अधिकार नाही’, मात्र सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करून रस्त्याने जाणारे पादचारी, वाहनांतील प्रवासी या सर्वांना ताटकळत ठेवले जाते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारे अवैध नमाजपठण थांबविण्यासाठी न्यायालयीन मार्गाने लढा देण्याची आवश्यकता आहे. अधिवक्त्यांनी यासाठी याचिका दाखल करण्यास पुढाकार घेतला पाहिजे, असे मत *सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता गौरव गोयल* यांनी मांडले.

*मुस्लिम देशांतही सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणावर बंदी; तर सेक्युलर भारतात हे लाड का ?*

*हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे या संदर्भात म्हणाले,* ‘सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणासाठी मशिदींमध्ये जागा कमी पडत असल्याचा तर्क सांगितला जात आहे, जो पूर्णत: चुकीचा आहे. जर त्याचप्रकारे हिंदूंनीही पूजा-अर्चा, आरती आदी करण्यास मंदिरांत जागा कमी असल्यामुळे आम्हीही सार्वजनिक ठिकाणी हे करतो, असे सांगितल्यास ते चालेल का ? आज अनेक मुस्लिम देशांत सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करण्यास बंदी आहे, तसेच असे कोणी केल्यास त्या व्यक्तींकडून मोठा दंड आकारला जातो. मग ‘सेक्युलर’ भारतात सार्वजनिक ठिकाणी अवैध पध्दतीने नमाज पठणाला पोलिसांकडून अनुमती का दिली जाते ? हिंदूंना मात्र सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सारख्या नियमित उत्सवांनाही अनुमती मिळवण्यास किती झगडावे लागते ! त्याच वेळी गुरुग्रामसारख्या आधुनिक शहरात पोलीस सुरक्षेत सार्वजनिक ठिकाणी नमाजपठन केले जात होते, हे आश्चर्यजनक आहे. हिंदूंनी याचा निषेध करून याविरोधात संविधानिक मार्गाने लढा दिला पाहिजे.’ असे प्रसिद्धी पत्रक हिंदु जनजागृती समितीने दिले आहे.

*…………….👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!