पालकमंत्री उदय सामंत सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : विश्राम वारंग

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.18: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

सोमवार दिनांक 19 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 8.00 वा. शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून मोटारीने कणकवली जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 09.30 वा. खारेपाटण-कासर्डे ता. कणकवली येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सकाळी 11.00 वा. आंब्रड ता. कुडाळ (दिंडाळेवाडी) येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सकाळी 11.45 वा. वेताळबांबार्डे ता. कुडाळ येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 12.15 वा. पावशी-शिलटेवाडी ता. कुडाळ येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 12.45 वा. पिंगुळी ता. कुडाळ येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 01.30 वा. माणगाव ता. कुडाळ येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 02.30 वा. पाहणी स्थळावरुन मोटारीने सिंधुदुर्गनगरी ओरोसकडे प्रयाण. दुपारी 03.00 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक (स्थळ- नविन डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस सिंधुदुर्ग). दुपारी 04.00 वा. हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2020-21 करीता बदल करण्यात आलेल्या निकाषांबाबत आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमवेत चर्चा (स्थळ- नविन डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस सिंधुदुर्ग). सायं. 04.15 वा. पत्रकार परिषद. (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस सिंधुदुर्ग).  सायं. 05.30 वा. सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून मोटारीने पाली ता. जि. रत्नागिरीकडे प्रयाण.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

2 thoughts on “पालकमंत्री उदय सामंत सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..

  • October 18, 2020 at 4:27 am
    Permalink

    हि बातमीच काय समजत नाही.उदय सामंत कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत? सिंधुदुर्ग जिल्हा दौरा म्हणजे?

  • October 18, 2020 at 9:12 am
    Permalink

    हि बातमी काय आहे तेच समजत नाही.उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्हाचेच पालकमंत्री आहेत ना?मग? कुठे बाहेर असतात का? कठीण आहे?🤔 कसं होणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!