मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र आंबोलीत व्हावे तसेच भविष्यात या उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर झाले तर तेही करता यावे म्हणून पन्नास एकर जमीन सुचविण्यात आली-आमदार दिपक केसरकर
*_🛑 मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र आंबोलीत व्हावे तसेच भविष्यात या उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर झाले तर तेही करता यावे म्हणून पन्नास एकर जमीन सुचविण्यात आली-आमदार दिपक केसरकर*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*_
*✍️ प्रतिनिधी:-प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी,दि,:-५ नोव्हेंबर*
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र आंबोलीत व्हावे तसेच भविष्यात या उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर झाले तर तेही करता यावे म्हणून पन्नास एकर जमीन सुचविण्यात आली आहे याशिवाय इंटरनॅशनल स्कूल आणि पर्यटनासाठी देखील जागा या ठिकाणी राखीव ठेवता येईल असे आमदार दिपक केसरकर यांनी म्हटले आहे.
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सावंतवाडी येथे भाडे तत्त्वावर सुरू आहे यासाठी आंबोली पर्यटन स्थळी ५० एकर जागा सुचविण्यात आली आहे तेथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र, इंटरनॅशनल स्कूल आणि पर्यटनासाठी जागा असेल. भविष्यात उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर झाले तर तशी सुविधा देता येईल असे आमदार केसरकर म्हणाले आरोस याठिकाणी एसईझेड प्रकल्प व्हावा म्हणून सर्वेक्षण सुरू आहे बांदा येथे इंडस्ट्रीयल प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू असून आडाळी एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा प्रगतीपथावर आहेत, असे आमदार केसरकर यांनी सांगितले.
पर्यटन जिल्ह्यात खाजगी गुंतवणुकीतून प्रकल्प झाल्यास ते जलद होतील असे पर्यटन महामंडळाने म्हटले आहे त्यामुळे खाजगी गुंतवणुकीतून प्रकल्प आणण्याचा आपण प्राधान्य देत आहे असे आमदार केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडी शहरांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे त्याची आपणास कल्पना आहे माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर यांच्या काळात पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून प्रयत्न केले. पाळणेकोंड धरणावर गोडबोले गेट उभारून पाणी क्षमता वाढवली आहे. मात्र आता नळ कनेक्शन जास्त झाल्यामुळे नगरोत्थान मधून ४२ लाख रुपयांच्या पाणी योजनेला मान्यता देण्यासाठी पाठपुरावा सुरू असून पाण्याबाबत सावंतवाडीकर स्वयंपूर्ण व्हावे तसे प्रयत्न आहेत, असे आमदार केसरकर यांनी सांगितले.
तिलारी पाणी योजना लाईन वेंगुर्ले पर्यंत जात आहे. सध्या कोंडुरा पर्यंत लाईन झालेली आहे वेंगुर्ले याठिकाणी पर्यटन प्रकल्प येत आहेत या योजनेचा फायदा होईल तसेच ग्रामीण पाडण्यासाठी ४५ कोटी रुपये मंजूर आहेत पंतप्रधान समृद्धी पाणी योजना ग्रामीण भागात राबविली जाणार आहेत तिलारी पाणी योजनेचे सागरी किनार्यावरील तारकर्ली भोगवे पर्यंत पाणी पोहोचावे म्हणून प्रयत्न आहेत. या लाईनवरील गावांना देखील पाणीपुरवठा केला जाईल असे ते म्हणाले
आपण ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेबाबत गृहराज्यमंत्री असताना निर्णय घेतले होते त्यांचा अंमल होतो आहे किंवा कसे? यासाठी आपण गृहमंत्र्यांची वेळ निश्चित केली होती मात्र गृहमंत्र्याना कोरोना झाल्यामुळे ही बैठक पुढे गेली आहे. अवैद्य दारू आणि अंमली पदार्थ याबाबत कडक पावले उचलणे आवश्यक आहे तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत देखील आढावा घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले
सावंतवाडी ची ऐतिहासिक जेल, बांदा ऐतिहासिक पोलीस ठाणे किल्ला या भागात पर्यटन व्हावे म्हणून प्रयत्न आहेत. चांदा ते बांदा योजनेचा पुढील दोन ते तीन वर्षे मुदतवाढ मिळाली तर अनेक प्रकल्प कार्यान्वित होऊन जिल्ह्याचा कायापालट होईल यासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती केली आहेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शब्द दिलेला आहे तो ते निश्चित पाळतील असे ते म्हणाले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*