रस्ते खोदाई ची घाई कोणासाठी ; सुरेश भोगटे
_*🛑 रस्ते खोदाई ची घाई कोणासाठी ; सुरेश भोगटे*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-२३ :-* शहरामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसात शहरातील तसेच मुख्य बाजार पेठेतील रस्ते केबल साठी खोदाई चे काम चालू करून व्यवसायिकांच्या धंद्यावर परिणाम होत आहे, शहरातील व्यवसायिकात तीव्र संताप पहायला मिळत आहे, आधीच कोरोना मुळे दुकानदार डबघाईला आलेले असताना आता दिवाळी सणाच्या तोंडावर दुकानदारांच्या दुकानात या खोदाईमुळे माती धूळ अशा कारणाने दिवाळी सणाचा माल वाया जात आहे तरी नगरपरिषदेने या खोदायला ऐन दिवाळीत परवानगी कशी काय दिली मुख्याधिकारी यांना संपर्क साधण्याचे प्रयत्न केले असता त्यांना संपर्क होऊ शकला नाही असे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सांगीतले.
ह अशा तऱ्हेने दुकानदारांना व्यावसायिकांना त्रास देण्याचे काम चालू आहे तरी नगरपरिषदेतील पदाधिकाऱ्यांनी तात्काळ खोदाई थांबवावी अन्यथा व्यवसायिक खोदाईचे काम बंद पडतील याची नगरपरिषदेने दखल घेऊन व्यवसायी का नाम होणारा त्रास थांबवावा अन्यथा व्यवसायिक रस्त्यावर उतरून खोदाईचे काम आपण थांबवतील असा इशारा माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी दिला आहे.

