कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसिंधुदुर्ग

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या पेडणे येथील हल्ल्यामागे कार्यालयातीलच घरभेदी

*🛑राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या पेडणे येथील हल्ल्यामागे कार्यालयातीलच घरभेदी* ं

*🛑सिंधुदुर्गातील अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची नार्को टेस्ट करावी म्हणजे सत्य बाहेर येईल*

*🛑गोव्यातील दारू अवैध मार्गाने येण्याचे प्रमाण घटल्यानेच हा पूर्वनियोजित हल्ला**_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज* *अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*

*🎴सावंतवाडी, दि- :-२२ऑक्टोबर*
खाजगी वाहनातून विशेष मोहीम वर आलेल्या राज्य उत्पादन शुल्क मुंबई भरारी पथकाची माहिती पेडणे गोवा येथील बार व्यवसायिकांना देणारे दुसरे तिसरे कोणी नसून खात्यातील च घरभेदी असल्याचा सुगावा आमच्या हाती लागला आहे, यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची व तेथील कर्मचाऱ्यांची नार्को टेस्ट करावी म्हणजे सत्य बाहेर येईल अशी आमची राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्याकडे मागणी आहे.
पेडणे गोवा येथे दारू साठवण्याचे मोठे गोडाऊन आहे व त्या गोडवान मधूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात व इतरत्र अवैद्य मध्ये पुरवठा केला जातो अशी माहिती मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती, व हे पथक गुप्त कामगिरीवर निघाले होते, याबाबतची माहिती खात्याअंतर्गतच असणार त्यामुळे मुंबईतील काही घरभेदी कर्मचाऱ्यांनी ,अधिकाऱ्यांनी, याबाबतची कल्पना सिंधुदुर्गातील अधिकाऱ्यांना दिली असावी व त्यांनी गोव्यातील गोडाऊन मालकाला टीप देऊन सुनियोजित कट रचून हल्ला घडवून आणल्याचा संशय आहे.
कारण राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे हे अधिकारी ज्यावेळी आपले खाजगी वाहन घेऊन पेडणे गोवा येथे पोचले व त्या गोडवान च्या परिसरात फेरफटका मारत असताना अचानक ५० ते ६० लोकांचा जमाव त्यांच्यावर चाल करून आला व काही समजायच्या आतच हल्ला केला यावरून माहिती देऊन रचलेला हा कट असल्याचे निदर्शनास येते, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे असे आमचे मत आहे.
राज्य उत्पादन शुल्क मुंबई येथील पथकाच्या अधिकाऱ्यांची तसेच सिंधुदुर्गातील सिंधुदुर्गातील राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी होऊन प्रसंगी त्यांची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे तरस या मागील सत्य बाहेर पडणार आहे, अनोळखी माणूस आल्यामुळे आपल्याला ते चोर असल्याचे वाटले व आपण हल्ला केला हे सांगितलेले बनाव नाट्य म्हणजे एक प्रकारचे थोतांड आहे, हा पूर्वनियोजित कट होता त्यामुळेच एवढी गंभीर दुखापत संबंधित अधिकाऱ्यांना झाली व एका कर्मचाऱ्याला गोवा बांबोळी येथे तर एका अधिकाऱ्याला पूणे येथे अधिक उपचारासाठी पाठवावे लागलेव हा प्रसंग त्यांच्या जीवावर बेतला असता त्यामुळे अधिकाऱ्यांचे मनोधैर्य वाढवायचे असेल तर या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
गोव्याहून सिंधुदुर्गात व महाराष्ट्राच्या इतर भागात दिवसाकाठी लाखो रुपयाची दारू वाहतूक केली जाते,या बाबत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने सतत आवाज उठवल्यावर याला काही प्रमाणात आळा बसला तर सिंधुदुर्गातील दारे व्यावसायिकांमध्ये आता गोव्यात मधून अवैध दारू कशी आणणार याबाबत खलबते घडु लागली, त्यात सावंतवाडी व कुडाळ येथील अवैध व्यवसायांमध्ये मध्यंतरी काही ठिकाणी ठिणग्या उडल्या त्यामुळे बऱ्याच जुन्या अवैध दारू व्यवसायिकांनी आपले धंदे बंद केल्याचे चित्र आहे. तर या धंद्यात जी नवी पिढी घुसली आहे ती अन्य पर्याय शोधून सिंधुदुर्गात दारू कशाप्रकारे आणली जाईल याची व रचना करीत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून आता टेम्पो मधून ही दारू वाहतूक केली जात आहे, यावर सिंधुदुर्गातील पोलिसांनी, राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी भरारी पथकाने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे अधिकारी आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यांच्या जीवावर पैशासाठी उठले नाही तर नवलच, कारण यांना हरामाचा पैसा खाण्याची सवय पडली आहे ,त्यासाठी गांचा हा खटाटोप चाललेला असतो मात्र यापुढे असे प्रकार होता कामा नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी हल्ल्याची एका स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून रडारावर असलेल्या काही अधिकाऱ्यांची कर्मचार्यांची नार्को टेस्ट करावी म्हणजे सत्य बाहेर ये अशी आमची मागणी आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_

*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*

*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*

*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा

*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!