कोकणसंपादकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

. *मानव सेवा ईश्वर सेवा माणून काम करणारे लोकाभिमुख अधिकारी सुशांत खांडेकर*

लाॅक डाऊन काळात देवदूता सारखे काम करणारे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर*

*🛑तोक्ते चक्रीवादळात आरोंद्यातील वृध्द जोडप्याला वेळेत मदत केल्यावर मुलीने मेल पाठवून मुंबईतून मानले आभार*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ संपादकीय:-*सीताराम गावडे*

*🎴सावंतवाडी,दि,:-*
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ,तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा ,या ओळींची आठवणी सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांची कार्यपद्धत पाहिल्यानंतर आपसूकच होते, गरिबातल्या गरीब व्यक्तीचे काम सर्वप्रथम व्हायला हवे, त्यांना कोणीच वाली नसतो, श्रीमंत आपले काम कसेही करून घेईल मात्र गरीब व्यक्तीला कामासाठी हेलपाटे मारावे लागणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे,या मताचे सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर असल्यामुळे अनेक गोरगरिबांची कामे मी त्यांच्याकडे घेऊन गेलो मात्र कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी ती कामे करूनही दिली
सावंतवाडी मध्ये गेली तीस वर्षे पत्रकारिता करत असताना जवळपास दहा प्रांताधिकारी पाहिले मात्र त्यात अविनाश सुभेदार रविंद्र सावळकर , मिलींद हळदे,यांच्यानंतर गरिबीची जाण असलेला प्रांताधिकारी म्हणून सुशांत खांडेकर यांचे नाव घेतले तर ते वावगे ठरणार नाही, अशी अनेक उदाहरण आहेत जी खांडेकर साहेबांच्या कर्तृत्वाची पोचपावती देणारी आहेत. मात्र त्याचा कोठेही मोठेपणा ते मीरवत नाही अथवा प्रसिध्दीही नाही, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे,आपल्या तीन वर्षांच्या कारकिर्दीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या दरबारी सोडवले गेलेत, मळगावच्या एका शेतकऱ्याला तर जमीन विभक्त करायला एका एजंटाने त एक लाख रुपये सांगितले होते,तो थेट प्रांताधिकारी खांडेकर यांना भेटला व आपली हकीकत सांगितली, खांडेकर साहेबांनी त्वरीत तलाठी ,सर्कल ,यांना बोलावून घेऊन त्यांचे सर्व सातबारे काढायला लावले व अवघ्या सात दिवसात जमिनीचे आशलगीकरन करून दिले ते ही शासकीय फी व्यतिरिक्त एक रुपया न घेता व ज्यांनी या कामाला सहकार्य केले त्यांचा खांडेकर साहेबांनी सत्कारही केला.
प्रसंगी आपल्या खिशातून पैसे बाहेर काढून चहा टपरी वाल्याचे महिन्याचे रेशन भरणारे सुशांत खांडेकर या प्रांतांमध्ये मी देव पाहिला, तर आपल्या कर्मचाऱ्यांना ही कोल्हापुरी मिसळ, पांढरा, तांबडा रस्सा आवर्जून देणारे त्यांचे कुटुंबही पाहिले. त्यामुळे खांडेकर हे प्रांताधिकारी म्हणून सावंतवाडीत रुजू झाल्यानंतर तर त्यांनी त्या पदाला खऱ्या अर्थाने न्याय दिला.
कोरोना च्या काळात अडलेल्या रुग्णांना मदत करणे, प्रसंगी आपल्या कार्यक्षेत्रात नसतानाही गोवा ,कोल्हापूर ,येथील डॉक्टरांचे संपर्क नंबर काढून त्यांना विनंती करणे ,तो रुग्ण त्या हाॅस्पिटल पर्यंत पोचेपर्यंत त्याची चौकशी करणे, त्याला लागणारी सगळी मदत करणे,अशी कितीतरी कामे खांडेकर साहेबांनी केली मात्र त्याचा कोठेही गाजावाजा केला नाही,
त्यांच्यामधला एक उत्कृष्ट शेतकरीही मी पाहिला ,नेमळे मध्ये गुरु नाईक यांच्या आंब्याच्या बागेत जाऊन बांधावर तासन् तास उभे राहून शेतीतील पिंकांशी बोलणाऱ्या अधिकाऱ्यातील मी शेतकरी पाहिला, आपल्या शेतात जाऊन चार चार तास राबणारे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर हे वेगळेच रसायन आहे.
काहीजण फोटोसेशन साठी शेतात जाऊन नांगर हाती धरतात, फावडे हातात घेतात, तर खऱ्या अर्थाने शेतात घाम गाळणारा अधिकारी म्हणून सुशांत खांडेकर यांचे नाव घेतले तर ते कुठेही वावगे ठरणार नाही,गेल्या वर्षी लाॅकडाऊन च्या काळात भाजी विकणाऱ्या अनेक बायकांना खांडेकर साहेबांनी धान्यपुरवठा केला, आणि मला फोन करुन गोर ,गरीब कुटुंब असेल तर आपल्याला नावे द्या असे वारंवार सांगायचेत या मागे त्यांची एकच भावना होती एकही माणूस उपाशी राहू नये,, काही दिवसापूर्वी तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा स़पूर्ण सिंधुदुदुर्गा बसला यात आरोंदा या भागातील एका युवतीचे वयोवृध्द आई वडील गावी अडकले, घरात पाणी शिरले ,झाडे पडली ,इथ पर्यंत ची बातमी तीला वडीलांनी फोन करून दिली ,मात्र एक दोन तासात तो फोनही बंद झाला ,शेजारचे ही फोन लागेनात ,मुलीचा जिव कासावीस झाला,काय करावे सूचेना इंटरनेट ढवळत असताना सुशांत खांडेकर यांचा मोबाईल नंबर त्या युवतीला मिळाला,तीने फोन लावला व रडायला लागली साहेबांनी तीला शांत केले व हकीकत ऐकून घेतली व म्हणाले तू निर्धास्त रहा काळजी करू नकोस,तूझ्या आई वडिलांशी तूझा संपर्क लवकरच करुन देऊ,मग त्या युवतीने विचारले आपण कोणत्या हुद्द्यावर आहात , उपविभागीय अधिकारी म्हणजे काय सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावर ती युवती शांत झाली,व पुढे खांडेकर साहेबांचे काम सुरु झाले ,आरोदा तलाठी फोन लावला तो नाॅट रिचेबल ,नंतर सातार्डा तलाठी सापडला,त्याला त्या युवतीच्या घरी पाठवून सर्वोतोपरी मदत करण्याचे फर्माण सोडून तीथे गेल्यावर त्या युवतीचे आई वडिलांशी मोबाईल वर बोलणे करून देण्यास सांगितले,तलाठी घरी पोहचले तो पर्यंत,घरातले पाणी ओसरले,महसुल विभागाच्या माणसांनी मदत केली.घरात महिनाभर पुरेल असे धान्य होते,पण मोबाईल लागत नव्हते व लाईटही चार दिवस सुरु होणे कठीण होते,अखेर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी मोबाईल वरुन सदर युवतीला ही माहिती कळविली व त्या युवतीने कशा प्रकारे मेल करुन आभार व्यक्त केले ते तिच्याच शब्दात देत आहोत.
सुशांत खांडेकर – उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांनी केलेल्या मानवी प्रयत्नांचे आणि त्यांच्या मदतीबद्दलचे हे कौतुक आहे.
अरोंदा या दुर्गम खेड्यातल्या आमच्या पालकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नसल्यामुळे ,हे वादळ सुरू झाल्यापासून आम्ही खूप व्यथित होतो.
सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आणि जलकुंभ आणि घरे नष्ट झाल्याचा विचार येऊ लागला
या विचाराने आम्ही भयभीत झालो
आम्हाला आमच्या पालकांची कोणतीही बातमी कळली नाही आणि मग नेटमधून आम्हाला सुशांत सरांचा मोबाईल नंबर मिळाला.आणि मी फक्त एक संदेश दिला आणि आवश्यक कर्मचार्‍यांना मदतसाठी माझ्या वडिलांच्या घरी पाठवले आणि त्यांच्या सुरक्षिततेची पुष्टी केली.
मी माझ्या पालकांशी संपर्क साधू शकले आणि यामुळे मला खूप आनंद आणि शांती मिळाली.
मर्यादित कालावधीत आपल्या त्वरित प्रतिसादासाठी आणि या कठीण क्षणी माझ्या आई-वडिलांच्या घरी पोचलेला आपला तपशीलवार शोध केल्याबद्दल धन्यवाद सर.
आम्हाला आपल्यासारख्या अधिकारी लोकांची आवश्यकता आहे – कृपया माझे मनापासून कौतुक स्वीकारा आणि पुन्हा एकदा. धन्यवाद आणि देव तुम्हाला आशीर्वाद देवो
(बेनिता डिसोझा, मुंबई)
यावर मी एकच म्हणेन दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

अटी व नियम लागू

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FiUpx9Y03kdHjAHlJAYwkX

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!