शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सिंधुदुर्ग शासन निर्णयाचे सिंधुदुर्ग शिवसेनेकडून जाहिर स्वागत..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१७: गेल्या अनेक वर्षांची सिंधुदुर्ग जिल्ह्याची शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. गेली अनेक वर्षे जिल्ह्यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणण्याच्या घोषणा बऱ्याच नेत्यांनी करुन जिल्हा वासियांकडून आपली पाठ थोपटवून घेतली होती. परंतु महाराष्ट्र राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार अस्त्विात आल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना. उदय सामंत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रशासनाकडे वारंवार सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालय होणेसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आंगणेवाडी यात्रेदरम्यान सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मंजूर करुन देणेबाबत सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना आश्वासन दिलेले होते. आज सिंधुदुर्ग जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय मंजूरीचा शासन निर्णय पारित करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली वचनपूर्ती पूर्ण केली आहे. तसेच खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा व प्रयत्न फळास आला आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या माध्यमातून जिल्हा वासियांची वैद्यकिय परवड थांबणार असून वैद्यकिय सुविधा सुरळीत मिळणेस मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण वर्गाला डॉक्टर होण्यासाठी हक्काचे मेडिकल कॉलेज मिळणार आहे. ही बाब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. आणि याचाच आनंद सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मंजूरीच्या शासननिर्णयाचे स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जल्लोष करीत आहे.
या प्रसंगी शिवसेना जि.प. गटनेते नागेंद्र परब, शिवसेना महिला प्रमुख सौ.जान्हवी सावंत, डॉ. प्रविण सावंत, सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण सदस्य छोटू पारकर, युवासेना तालुका समन्वयक योगेश तावडे, युवासेना शहर प्रमुख सागर परब, सोमा घाडीगांवकर, कु.सोनल पालव, श्री. धर्मा सावंत, श्री. आशिष परब, श्री. सुशिल निब्रे, श्री. भगवान परब, इत्यादी उपस्थित होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_