पुन्हा एकदा राज स्पोर्ट च्या प्रशिक्षकांनी वाचवला समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाचा जीव…………._ शिरोडा समुद्रातील घटना; मोठा अनर्थ टळला
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश गावडे
*🎴शिरोडा, दि१७ऑक्टोबर- :-
पुन्हा एकदा राज स्पोर्ट च्या साहसी जलक्रीडा प्रशिक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून शिरोडा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाचा जीव वाचवला. ही घटना आज रविवार 17 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी समुद्रकिनारी घडली. मात्र वाढत्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने येथे लाईफ गार्ड ची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.
आज रविवारची सुट्टी असल्याने शिरोडा समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती. काही अति हौशी पर्यटक पोहण्याच्या
आज रविवारची सुट्टी असल्याने शिरोडा समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती. काही अति हौशी पर्यटक पोहण्याच्या नादात समुद्राच्या पाण्यात उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. त्यांना वाचविण्यासाठी सावंतवाडी येथील लाके नामक एक स्थानिक युवक उतरला. परंतु त्यालाही पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला, हे पाहून राज स्पोर्ट चे भालचंद्र उर्फ आनंद नाईक यांनी आपल्या पथकाच्या ठिकाणी धाव घेऊन अन्य साथीदारांना बुडणाऱ्या पर्यटकाबाबत सांगितले. त्यानुसार तत्काळ रेहान मोंडोल, हस्सिम खवटून, क्लिफ्टन अल्फान्सो, दत्तराज कोरगावकर यांनी जेस्की घेऊन मोठ्या शीताफितीने प्रसंगावधान राखत त्या युवकाला लाईफ जॅकेट देऊन पकडुन पाण्याबाहेर आणले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून पर्यटकांकडून राज स्पोर्ट च्या प्रशिक्षकांच कौतुक होत आहे.
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

