रत्नागिरीत दिड लाखाचा गांजा जप्त, आरोपींना सापाळा रचून घेतले ताब्यात
*🛑 रत्नागिरीत दिड लाखाचा गांजा जप्त, आरोपींना सापाळा रचून घेतले ताब्यात*
*🛑 सिंधुदुर्ग पोलिसांनी मात्र मुख्य सूत्रधाराकडे दाखवला चौदा ग्रॅम गांजा व विकणाऱ्या कडे तीन किलो*
*🛑 सिंधुदुर्ग पोलीस अंमली पदार्थांच्या बाबतीत जागे कधी होणार,की त्यांची मुले या विळख्यात सापडल्या नंतर*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 रत्नागिरी:३ ऑक्टोंबर*
रत्नागिरी- ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह
रत्नागिरी शहर पोलिसांना गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. तब्बल १ लाख ४२ हजार रुपये किमतीचा आठ किलो वजनाचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला असून या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी रेल्वे फाटा येथे नाकाबंदी करून त्या ठिकाणाहून एसटीमार्गे प्रवास करून गांजा हा अंमली पदार्थ घेउन जाणाऱ्या तीन संशयितांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रत्नागिरीतील भाडे परिसरात राहणारा रुहान होडेकर नामक तरुणाला गांजाची विक्री करताना शहर पोलिसांनी रंगेहात पकडले होते आणि त्यानंतर या टोळीचा पर्दाफाश करण्याचा मास्टर प्लान तयार केला. रुहान याला अटक केल्यानंतर शहर पोलिसांनी गांजा पुरवठा ज्या वाहनातून होत आहे त्याबाबत माहिती काढली आणि मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नाका-बंदी सुरू केली.
कोल्हापूर-रत्नागिरी या एसटी बस मधून गांजाची
तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस निरीक्षक फाट्यानजीक नाकाबंदी लावली, पहाटेच्या सुमारास बस त्या ठिकाणी आली पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. ही बस रेल्वे स्टेशन फाट्यानजीक थांबल्यानंतर पोलिसांनी बसची झडती घेतली त्यावेळी बस मध्ये अक्षय चंद्रकांत जिडगे या संशयित तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
अक्षय चंद्रकांत जिडगे, विनोद आसाराम कार्ले दोघेही हातकणंगले जि. कोल्हापूर येथील राहणारे असून रुहान रियाज होडेकरला भाट्ये, रत्नागिरी येथून आधीच अटक करण्यात आली. गांजा विरुद्ध केलेल्या कारवाई प्रकरणी शहर पोलिसांनी यांच्याविरोधात एनडीपीएस कायदा कलम ८ (क) २० (ब) (ब), २९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

