कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

.सावंतवाडी शहराचे स्वच्छता ‘ब्रॅण्ड ॲम्बेसिडर’ म्हणून भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांची निवड

*🛑.सावंतवाडी शहराचे स्वच्छता ‘ब्रॅण्ड ॲम्बेसिडर’ म्हणून भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांची निवड*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : राहुल गायकवाड*

*🎴सावंतवाडी, दि- :-३ ऑक्टोबर*

सावंतवाडी : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त सावंतवाडी नगरषरिदेच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सावंतवाडी शहराचे स्वच्छता ‘ब्रॅण्ड ॲम्बेसिडर’ म्हणून भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांची निवड नगराध्यक्ष संजू परब यांनी केली. तसेच डॉ. प्रसाद देवधर, माजी आरोग्य सभापती अॅड. परिमल नाईक यांचा नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान शुभारंभ करण्यात आला. यावेळी या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शहर स्वच्छतेची शपथ देण्यात आली. दरम्यान, शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई मित्रांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर, पुर्वा मसुरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शहर स्वच्छतेसाठी सफाई मित्र, नगरपरिषद कर्मचारी मेहनत घेत आहेत.
डॉ. प्रसाद देवधर यांच्या माध्यमातून याला अधिक गती आणि महत्व प्राप्त होईल असा विश्वास नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला. तर प्रास्ताविकात आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी स्वच्छ
प्रास्ताविकात आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मागचा हेतू विशद करत सावंतवाडी शहर स्वच्छतेत नंबर वन करण्याचा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, डॉ. प्रसाद देवधर यांनी मनोगत व्यक्त करताना, स्वच्छतेची महती विशद केली. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशव्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांना भेट देत कृती युक्त मार्गदर्शन केले. तर सावंतवाडी शहर स्वच्छतेच्या बाबतीत समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, दिपाली भालेकर, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, लायन्स क्लबचे अशोक देसाई, अमेय पै, विद्याधर तावडे, ला. गजानन नाईक, बाळ बोर्डेकर, अरविंद पोकर, नगरपरिषदेच्या आसावरी शिरोडकर, रसिका नाडकर्णी, वैभव नाटेकर आदी उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_

*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*

*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*

*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा

*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!