गोव्यात शेख तर सावंतवाडीत बेग..अंमली पदार्थाचे मूळ हेच*
*🛑आता कारवाई करायला तपासी अधिकाऱ्यांच्या हाताला लकवा मारला काय?*
*🛑शिवसेना,भाजप,काॅग्रेस, राष्ट्रवादी,या पक्षांचे खासदार,आमदार, मंत्री, अध्यक्ष, नगराध्यक्ष,मूग गिळून गप्प* *
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 संपादकीय: सीताराम गावडे*
*🎴सावंतवाडी,दि,:८ ऑगस्ट*
कोणीतरी अशी पटापट गमंत आम्हा सांगेल काय…. या गांजा मध्ये दडलंय काय? ,या तपासा मध्ये लपलय काय?, किती भयानक व मन पिळवटून टाकणारा हा गांज्याचा प्रकार आहे, यामध्ये अडकलेला तरुण सहजासहजी बाहेर पडत नाही.व या नशेपायीच तो आपले जिवन संपवतो,हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचा हा प्रकार आहे.मात्र याचा तपास करणारी यंत्रणाच भ्रष्टाचाराने बरबटलेली असेल तर सत्य बाहेर येणार तरी कसे..बाकी बारीक सारीक प्रकरणात मर्दानी दाखविणारी ही यंत्रणा व त्यांचे अधिकारी यांचे हात आता का पुढे सरसावत नाही कि त्यांच्या हाताला लकवा मारला आहे.
बाकी शहरात घडलेल्या वेगवेगळ्या प्रकरणात बेंबीच्या देठा पासून बोंबलणारे समाज सुधारक,विरोधी पक्ष, सत्ताधारी आता कोणत्या वाघ बिळात जाऊन लपून बसलेत हेच समजेनासे झाले आहे.
ज्या बाॅबी बेग कडे तीन किलो गांजा सापडला त्याला हा गांजा पुरवला त्या प्रमुख सुत्रधाराकडे पोलिसांच्या म्हणण्यानुसार फक्त सोळा ग्रॅम गांजा मिळाला ,आहे की नाही नवल,पुरवठा दाराकडे सोळा ग्रॅम आणि विकणाऱ्या कडे तीन किलो ,पोलीसांचा तपासच लय भारी.. आणि म्हणे मुख्य सूत्रधार गजाआड असे जाहिर करताना थोडी जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती,यालाच म्हणतात प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे आणि ते सर्वांनी मिळून खाल्ले असा आमचा थेट आरोप आहे.
पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक विरोधी पक्षाचे आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष संजू परब,माजी खासदार डॉ निलेश राणे,माजी आमदार प्रमोद जठार,राजन तेली,प्रवीण भोसले, केंद्रीय मंत्री नारायण राणे,सर्वजणच चिडीचूप,चकार शब्द कोणीही काढला नाही, फक्त माजी आमदार परशुराम उपरकर वगळता एकाही नेत्याला याचे गांभीर्य वाटले नाही ,त्याना वाटले आपल्या सिंधुदुर्गात चरस,गांजा, ब्राऊन शुगर,मिळू लागले म्हणजे आपण पूणे मुंबई च्या रांगेत आलो,मात्र ही रांग विनाशाकडे नेणारी आहे हे ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी वेळ गेलेली असेल हे संबंधितांनी ध्यानी ठेवावे.
आपले डोंगर पोखरून,रानमाळे मोकळे करून ,आपल्या जमिनी अल्पदरात केरळीयनांना विकल्या आज त्याच बागेत हे विष तयार होत आहे, म्हणूनच त्यांच्या अननस, केळी बागयतीत बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही, हे आम्ही जबाबदारी ने लिहीत आहोत.आणि या केरळीयन दलालांना स्वताच्या क्षणिक सुखासाठी जवळ करणारे ही आमचेच राजकीय नेते मंडळी.सापाच्या विष काढण्यापासूनचे सर्व प्रकार यांच्या बागेत घडत असतात आणि क्षणीक सुखासाठी प़ोलीसही या कडे दुर्लक्ष करतात.व आज त्याच बागेतून ही जहरी नशा जिल्ह्यात पुरवठा केली जाते व यामागचा म्होरक्या एका विशिष्ट जमातील आहे.
गोव्यात चार लाख किंमतीचा गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला हा गांजा फिरोज शेख यांच्या कडे मिळाला व त्याचे मुंबई कनेक्शन आहे . एकंदरीत काय गोव्यात शेख तर सावंतवाडीत बेग हेच अंमली पदार्थाचे तस्कर.आणि हेच लोक काही काॅलेज युवकांची गरीबी हेरून त्यांना सप्लायर म्हणून नेमतात व झटपट श्रीमंत होण्याच्या नादात हे युवक त्यात गुरफटले जातात.तपास करणारे अधिकारी यांच्या मुळापर्यंत पोहचणारच नाहीत,कारन एकदा विषय संपवला तर पुढची मलीदा बंद होणार, म्हणून हा तपास राज्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे द्यावा अशी आमची मागणी आहे,म्हणजे दुध का दुध पाणी का पाणी होईल व कोण किती खोलात तेही समजले व कोणी २५लाख खाल्ले आणि कोणी पसत्तीस लाख घेतले ते ही शंभर कोटी प्रमाणे बाहेर येईल असे आमचे मत आहे.
ज्या आई वडीलांनी आपल्या मुलांची सुंदर स्वप्न रंगवली त्यांच्या डोळ्यात देखत स्वप्नांचा चक्काचूर झालेला पाहून त्यांचे मन पिळवटून जात असेल मात्र प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे समाजव्यवस्थेतील प्रमुख घटक निद्रिस्त असल्याचे सोंग आणतात त्यांना जागे कसे करायचे हा मोठा प्रश्न असतो,मात्र आता यांना जागे करण्यासाठी घंटानाद नाही किंवा ढोल वाजवा आंदोलन नाही किंवा उपोषण नाही तर यांच्या कानात सळसळते तेल ओतायची वेळ आली आहे असे आमचे ठाम मत आहे, त्यामुळे गांजा अवैध दारू याचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर कुठल्याही भ्रष्ट यंत्रणेवर अवलंबून न राहता गाव करेल ते रावाच्या लल्लाटीत नाही या प्रचलित म्हणी प्रमाणे याविरुद्ध गावा गावातून उठाव होणे गरजेचे आहे.
*👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
_*होय.. !*_
_*आता “भारतीय डाक ” जीवन विमा कवच म्हणजे, कमीत कमी प्रिमियम आणि जास्तीत जास्त बोनस …!*_
👉 *वयोमर्यादा 19 ते 55 वर्षा पर्यंत*
👉 _*20 हजार पासुन 50 लाखांपर्यंत विमा काढण्याची मुभा.*_
👉 *3 ते 4 वर्षानंतर कर्ज घेण्याची पुरेपूर सुविधा.*
👉 _*3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करण्याची सुविधा.*_
👉 *कलम 80सी अंतर्गत आयकरात सूट.*
👉 _*प्रिमियम ऑनलाइन आणि ऑफलाईन भरण्याची सुविधा.*_
🤝 _*आमच्याअधिकृत एजंट यांचा सल्ला घेण्यासाठी आजच 🙏संपर्क साधा*_
———————–🎉🎉———————–
🧑🏻💻 _*श्री अजय अर्जुन भाईप*_
*( अधिकृत डायरेक्ट सल्लागार )*
☎️ *9422911597*
☎️ *9373145167*
👉 _*टीप:-* *कृपया मास्क 😷 वापरणे अनिवार्य आहे* ._
———————-🙏🙏————————-
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_