चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाला माजी खासदार निलेश राणे यांची भेट : कामकाजाचा घेतला आढावा..
ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना नोकर भरतीत प्राधान्य देण्याची केली मागणी..
समीर चव्हाण
माजी खासदार तथा भाजपा सरचिटणीस निलेश राणे यांनी आज चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाला भेट दिली व विमान सेवा शुभारंभ तयारीचा आठावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते.
यावेळी विकासक कंपनीचे किरणकुमार, प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर, श्री. सकपाळ, श्री.शिंदे आदींनी त्यांना माहिती दिली. यावेळी निलेश राणे यांनी ९ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या विमानसेवा आणि त्याबाबत ची तयारी याबाबत तसेच उद्घाटन कार्यक्रम बाबत माहिती घेतली. यावेळी बंड्या सावंत, चिपी माजी सरपंच प्रकाश चव्हाण, धनश्री चव्हाण, कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत, प्रकाश राणे, भाजप युवा मोर्चाअध्यक्ष प्रसाद पाटकर, शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे, संजय दूधवडकर आदी उपस्थित होते. यावेळी विमान तळ प्राधिकारण चे किरणकुमार यांनी माहिती देताना सांगितले की, सिंधुदुर्ग विमानतळ शुभारंभ कार्यक्रम हा निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. कारण कोव्हिडं 19 च्या पाश्वभमीवर ही काळजी घेण्यात येत आहे. तसेच हा विमानतळ राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रीन फिल्ड विमानतळ आहे,असेही त्यांनी सांगितले.