कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी नुकसानभरपाई न मिळाल्यास प्रांताधिकारी कार्यालयावर केले जाणार धडक आंदोलन..

 

🛑 कळणे येथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे तहसीलदारांना निवेदन..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२८ :- दिनांक २९ जुलै २०२१ रोजी सकाळी ७.३० वाजता मौजे कळणे येतील शासन प्रस्थापित मायनिंग प्रकल्पाची तटरक्षक मानव निर्मित भिंत/बंधारा कोसळून साठवण केलेली खनिज माती व प्रचंड पाण्याचासाठा लोंढा कळणे धवडकीवाडीवरील वस्ती व शेतकऱ्यांच्या जमीन क्षेत्रामध्ये घुसून घरांचे, भातशेती, फळबाग लागवड, विहिरी, शेततळी, ग्रामीण पाणी पुरवठा, नळयोजना, नदीपात्र यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेंच साग, फणस व जंगली झाडे हि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. त्याचसोबत शेत-बागायती, सुपीक जमीन ओसाड व पडीक झालेल्या आहेत. कळणे गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन रस्त्यावर आलेला आहे. तरी आपले प्रशासन जागे होत नाही. शासनाने रीतसर पंचनामे केलेलं असून आम्हाला ते मान्य आहेत. असे असूनही अद्याप शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्या संधर्भात काही मागण्यांसाठी आम्ही दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी कळणे येथे उपोषण जाहीर केले होते.

माननीय तहसीलदार दोडामार्ग यांनी सर्व उपोषण कर्त्यांसमोर जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासन व संबंधित कार्यालयाशी चर्चा करून १५ दिवसात म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत निर्णय घेऊन मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन देऊन उपोषण स्थगित केले होते. परंतु कळणे बंधारा दुर्घटनेला जवळपास २ महिनेच काळ उलटून गेला असू अजूनही नुकसानग्रस्त शेतकरी न्याय मिळण्यासाठी ताटकळत आहे. अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसून ह्या संधर्भात जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भेट देऊन पाठपुरवठा केला होता. परंतु अजूनही न्याय मिळालेला नाही. दिलेल्या शब्दानुसार आम्हा शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण येत्या ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा न्याय मिळाला नाही ह्यासाठी धडक आंदोलन करणार आहोत. काही अपरिहार्य कारणामुळे कळणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे धडक आंदोलनाची तारीख २ ऑक्टोबर २०२१ च्या ऐवजी ८ ऑक्टोबर २०२१ हि तारीख कायम करण्यात आलेली आहे त्यानुसार शुक्रवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी आम्ही सर्व नुकसानग्रस्त शेतकरी न्याय हक्कासाठी सावंतवाडी-प्रांत अधिकारी (उप-विभागीय अधिकारी) कार्यालयास “धडक ” देऊन आंदोलन करणार आहोत. आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे आम्हा शेकऱ्यांवर “धडक आंदोलन” करण्याची वेळ आलेली आहे. तरी हे आंदोलन गांभीयाने घावे कारण या आंदोलनाचे जे काही परिणाम होतील त्या सर्वाना आपण आणि प्रशासन जबाबदार राहील. आम्ही शेतकरी बांधव आपल्या न्यायावर विश्वास ठेऊन आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत.असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या वेळी अभय पांडुरंग देसाई, श्री अरुण देसाई आणि इतर शेतकरी तहसिलदार कार्यालय मध्ये निवेदन देते वेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!